Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ जगदगुरू श्री संताजी महाराजांच्या आशीर्वादाने श्री संताजी सेना अकोला जिल्हा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजातील होतकरू महिलांकरिता शिवण क्लास च्या शुभारंभाचा श्रीगणेश करण्याचे आयोजन केले आहे.
तरी आपण सामाजिक हेतू ने प्रेरित असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहुन आम्हाला उपकृत करावे ही सविनय विनंती.
पुस्तक प्रकाशन हास्ते :- माननीय खासदार श्री. रामदासजी तडस, अ. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा
तेली गल्ली मासिक प्रकाशन हास्ते :- मा. उपमहापौर श्री. आबा बागुल, पुणे
विशेष उपस्थीती ः- श्री. जनार्दन जगनाडे, अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. अरूण काळे, अध्यक्ष पालखी सोहळा, श्री. प्रभाकर डिंगोरकर, मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. अंबादास शिंदे, मा. अध्यक्ष सुदूंबरे संस्था, श्री. रोहिदास उबाळे, मा. उत्सव अध्यक्ष, सुदुंबरे संस्था, सर्व पदाधीकारी तिळवण तेली समाज पुणे, श्री. चंद्रकांत वाव्हळ, पु. ग्रा. तैलीक अध्यक्ष, श्री. अनुपकुमार देशमाने व वारकरी.
गुरूवार दिनांक :- 30/6/2016 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री. संत संताजी महाराज जगनाडे पुला जवळ, तिळवण तेली कार्यालय भवानी पेठ, पुणे 42 येथे संपन्न होईल.
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
मिती ज्येष्ठ ॥7॥ सोमवार दि. 27/06/2016 ते आषाढ शु. ॥15॥ मंगळवार दि. 19/07/2016
| तिथी | वार दिनांक |
सकाळी प्रसाद व फराळ |
दुपारचा विसावा | दुपारचे प्रसाद देणार्या यजमनाचे नांव |
रात्रीचा मुक्काम |
रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| जेष्ठ वद्य 7 | सोमवार 27/6/2016 | श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे | श्री क्षेत्र सुदुंबरे | समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे |
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ रौप्य महोत्सवव देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्या सहकार्याने स्नेह व वधु - वर पालक परिचय मेळावा 8 मे 2016 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 भवानी मंगल कार्यालय तळेबाजार, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला.
मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी श्री. सदानंद तेली (अध्यक्ष देवगड तालुका तेली समाज ) हे होते. प्रमुख अतिथी मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ), श्री. सतिश वैरागी, जनार्दनशेठ तेली (माजी जि. प. उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा), श्री. रूपेश वायगणकर (नगररसेवक - मुंबई) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्वातंत्र्य सैनिक दगडू अंतू क्षिरसागर :- भिंगारची वेश ही एक इंग्रजांचे दडपशहीचे केंद्रबिंदू होते. याचजवळ क्षिरसागरांचे घराणे उगवत्या सुर्याला साक्ष ठेऊन रोज आरेरावीपणा जूलुम व अन्याय पहावा हे ठरलेले होते. जी काही तरूण मन महात्मा गांधीच्या विचाराने जागृत झाली त्यांपैकी प्रमुख हा एक या मातीचा आवाज हेता. आशावेळी भिंगारच्या स्वातंत्र्य सैनिकानी ठरवले. ब्रिटिश राजवटीला हादरा देऊ. त्यातील एक भाग म्हणुन नगरच्या सरोज टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवु आणी ही राजवट खीळ-खीळी करू. या सर्व कामात क्षिरसागर सहभागी होत. 6 महिने जेलमध्ये चक्की पिसत होते. बुलेटिन वाटणे चळवळ उभी करणे ही कामे केलीच. पैकी क्षिरसागर हे एक त्यांनी दारूबंदी व इतर लढे उभे केले. 1932 मध्ये दारू दुकान बंदी करण्यास सत्याग्रह झला. फौजदार अरेरावी करू लागला. त्यावेळी ब्रिटीश फौजदाराला क्षिरसागर यानी मारहाण केली. त्याचा परिणाम 21 दिवस शिक्षा झाली. नहीं रखना नहीं रखना ! ये जालिम सरकार नहीं रखना ! हा एक नारा होता. हा एक मातीचा आवाज होता. करू किंवा मरू हा एक संदेश होता.