Sant Santaji Maharaj Jagnade
शिर्डी :- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राहाता तालुका अध्यक्ष पदाची निवड शिर्डी येथे गणेश मंदिरात झाली. यावेळी निवडणुक निरिक्षक म्हणुन प्रांतिक उपाध्यक्ष श्री.करनकाळ, श्री. सुधाकर कवडे उपस्थित होती. या वेळी सर्वश्री भागवत लुटे अध्यक्ष उत्तर नगर जिल्हा, श्री. सोमनथ बनसोडे कार्याध्यक्ष उत्तर नगर जिल्हा, श्री. दत्तात्रय सोनवणे अध्यक्ष राहुरी तालुका, श्री. सदाशीव पवार, श्री. सुधाकर कवडे, जि. नाशिक असे किमान दोनशे समाज बांधव उपस्थीत होते. प्रत्येकाने सामाजीक प्रश्ना बाबत, पदाधीकारी कामकाजा बाबत विचार मांडले अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात निवडणुक प्रक्रिया संपन्न झाली
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 6)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
घरच्या कर्त्या बांधवाला घर चालवायचे आसते. त्याला सर्वांच्या मतांचा विचार करून निर्णयक्षम व्हावे लागत. सगळेच विकृत किंवा संस्कारी नसतात सगळेच कमवतेनसतात. परंतु त्यातुन मार्ग काढावा लागतो हीच बाब समाज संघटनेत लागु आहे. जेंव्हा व्यक्ती निष्ठ संघटना बनते. जेंव्हा ती दरबारी रूबाबत वावरते तेंव्हा तिला समान्यांचे प्रश्न समजतील का हे नक्की नसते. कै. गोपीनाथ मुंडेच्या समाजाचे प्रश्न आ. महादेव जानकर यांचे समाजाचे प्रश्न, आ. विनायक मेटे यांचे समाजाचे प्रश्न त्यांनी सोडविताना सामाजीक प्रश्नांना जवळ केले ? यातुन समाज जोडला दरबारा सारखी पदाधीकारी न बाळगता समाजीक प्रश्नाला जावुन भीडणारे तयार केले. व्यक्तीचे पदाधीकारी न बनता ते समाजीक प्रश्नांचे बनले. खिशात पैसा आहे. चार चाकी गाडी आहे. म्हणुन पदाधीकारी नव्हे तर डोक्यात सामाजीक प्रश्न किती आहेत. हे ओळखुन त्यांनी समाजाचे विघटन न करता संघटन केले ?
फॉर्म पाठविण्या संबंधी सुचना :
1) मेळावा स्थळ : निलकमल लॉन्स मंगल कार्यालय, चांडोली नाक्याजवळ, पुणे-नाशिक हायवे. (राजगुरूनगर)
2) फॉर्म सोबत रु. 300/ - (रू. तिनशे फक्त) रोख / मनीऑर्डर / डी.डी. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगुरूनगर यानावान पाठवावा कृपया चेक पाठवु नये.
3) फॉर्म सोबत 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो (अर्ध छातीपर्यंत) व त्यामागे स्वत:चे नांव व गावाचे नांव पेन्सिलने लिहुन त्यातील एका फोटो फॉर्मवर दिलेल्या जागी चिकटवावा व दुसरा फोटे प्लॉस्टिकच्या पिशवीत ठेवून स्टेपल करावा.
4) फॉर्म प्रत्यक्ष येऊन दिल्यास रोखीची पावती लगेच घ्यावी.
5) ज्यांच्याकडे हा फार्म असेल त्यांनी गरजूंना झेरॉक्स प्रत देऊन समाज कार्यात मदत करावी.
6) फॉर्म भरून झाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवावी.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 5)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
चिंतन शिबीराचे फड अनेक ठिकाणी झाले. मिटींगां नेहमीच होतात. त्यात आढावा बैठकांची रेलचेल ही होत आहे. तेंव्हा वीस वर्षींचा एक प्रसंग सांगतो. राजुर, ता. अकोले येथील स्टँडवर मे महिण्यात उतरलो. स्टँडच्या आवारात तेली समाजातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या दुकानात गेलो. त्यांनी जवळच असलेल्या ह.भ.प. कवाडे कडे पाठविले. ते वयोवृद्ध बांधव एकच वाक्य बोलले. अरे हा समाज लग्न व लाडू यातुन बाहेर पडु शकणार नाही. हे त्यांचे शब्द 20 वर्षांनंतर ही बाजुला जात नाहीत.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 4)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक बैठक सोडुन ही संघटना राजकारणाकडे वळली. काळानुरूप बदल झाला ती सुद्धा गरज समजु. काही वर्ष सर्व राजकीय पक्षाचे सर्व विचारंची मंडळी यात हेती. पक्षीय विचारा पेक्षा समाज विचार मोठा होता. पण आज काय झाले आहे. जो पक्ष सत्तेवर आहे त्यांच्याकडे आपले तोंड आहे. ते ही असावे परंतु आपण समाजसाठी काही मागीतले नुसत्या मागण्या करून देण्यासाठी ते खुर्चीत बसले नाहीत या साठी सत्तेतील व विरोधातील मंडळींचा एक दबाव गट करून पदरात काही मिळवले पाहिजे. ही वाटचाल संघटने द्वारे केली का ? यावर चिंतन झाले का ?