Sant Santaji Maharaj Jagnade
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
विजय बाभुळकर :- हे विदर्भ तैलिक महासंघासाठी व्यवस्था परिवर्तन अभियान हे मासिक काढतात. त्यात विदर्भ तैलिक महासंघाच्या उपक्रमाबरोबरच तेली समाजाच्या मागण्या निवेदन शासन दरबारी आदी बाबींवर जोर असतो विदर्भात आक्रमक असणारी ही संघटना म्हणुनच जनाधार मिळवु शकली विदर्भातील समाज बांधवांचे प्रबोधन त्यामुळे प्रगतीशील झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
मदन नागपुरे :- नागपुरहुन समाज क्रांती काढतात 8 पानांचे हे मासिक गेल्या 15 वर्षापासुन नियमित प्रकाशित होते. दरवर्षी सत्यशोधक विशेषांक काढतात. फुले आंबेडकरांच अनुयायी ओबीसी चळवळ चालवितात अस्तिवात 20 आदर्शप्रगती कॉलनी दिघोरी उमरेड रोड नागपुर 34 हा त्यांच पत्ता आहे. 100 रूपये वार्षिक वर्गणी व आठशे रुपये त्यात वर्गणी आहे. सध्या दोन हजार अंक काढतात.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
श्याम लोहबरेंचा स्नेहीदीप :- विदर्भातील स्नेहदिप चे प्रकाशन अनेकवर्ष चालले वार्षिक अंक विशेषत: वधुवरांची माहिती असलेला असे असले तरी त्यातून प्रादेशीक भेद मिटायला मदत झाली.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
सामाजिक बांधिलकीवाले दिलीप चौधरी :- मुळ खान्देशच मातीतील मिलकामगार असलेला हा क्रियाशील कार्यकर्ता काही दिवस 6 ते 8 पानांचे सामाजिक बांधिलकी मासिक चालविले प्रथम वैयक्तिक मालकी आता नव्याने बीपीटी अॅक्टनुसार नव्याने संचालक मंडळ नेमले खान्देशपुणे विभागात मासिकाद्वारे जनप्रबोधन सध्या अंकप्रकाशन बंद असून लवकरच सुरू करु असे ते सांगात. तैलिक माहासभेचे प्रसिद्धी प्रमख ही जबाबदारी.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली गल्लीचे देशमाने :- कोणते देशमाने ? तेली गल्लीचे देशमाने हे समिकरण रूढ झालेले देशमाने म्हणजे एकखांबी तंबू ! शिक्षक असलेला हा माणूस सुट्टी व रविवार पाहुन प्रवास करून समाज पिंजला. निवडक सुयश अशा बातम्यांपेक्षा तैलिक प्रबोधनास सर्वोच्च प्राधान्य मुळात समाज सेवेची गोडी दिली वाईचे तत्कालीन सााजिक नेते कै. रामचंद्र मेरूकर यांनी मार्गदर्शन दिले. 1983 ला तेली गल्ली सुरू केले.