पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
नागपूर : महाराष्ट्र राज्यातील नागपूर महानगरात अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व अखिल भारतीय तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश वाघमारे होते.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नई दिल्ली की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक गांधीनगर गुजरात मोदी भवन में आयोजित हुई बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष जय दत्त जी क्षीरसागर मुख्य अतिथि सोमाभाई मोदी राष्ट्रीय युवा अध्यक्ष छत्तीसगढ़ तेलगानी बोर्ड अध्यक्ष संदीप जी साहू थे संचालन राष्ट्रीय महामंत्री रामलाल जी गुप्ता अरुण जी भस्में ने किया बैठक में
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ - अखिल भारतीय तैलिक महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मनोज संतान्से यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
नागपूर, ता. १५ : संताजी ब्रिगेड व जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ११ मे दरम्यान ग्रीष्मकालिन संस्कार शिबिराचे करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन प्रा. अरुण रंधे आणि संगिता तलमले यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात पर्यावरण, अहिंसा, लाठीकाठी, कराटे, डान्स, चित्रकला, संगीत योगा, वेस्ट टू बेस्ट गणिताच्या सोप्या ट्रिक्स, कॉमन सेन्स अशा उपक्रमांचा समावेश होता. शिबिरात प्रा आदेश जैन, गौरव आळणे,