भीलवाड़ा। राजस्थान प्रांतीय तैलिक साहू महासभा का एक प्रतिनिधि मंडल महासभा के कार्यकारी प्रदेश अध्यक्ष देवराज तेली व भाजपा युवा मोर्चा के पूर्व जिला महामंत्री व पूर्व पार्षद गोपाल तेली के नेतृत्व में विधायक विट्ठल शंकर अवस्थी से मिला। उन्होंने तेली समाज के व्यापार को बढ़ावा देने के लिए सरकार से तेल घाणी बोर्ड की स्थापना की मांग की ।
खान्देश तेली समाज मंडळ धुळे महिला आघाडी आयोजित ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व मातांचा अमृत सन्मान सोहळा २०२३. रविवार दि. १२ मार्च २०२३ रोजी सायं. ४ वा. दाता सरकार भवन, स्वामी नारायण कॉलनी, धुळे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग आयोजित जागतिक महिलादिनानिमित्त "महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळा..!" रविवार दि.१२ मार्च,कल्याण दु.२:०० ते ५:०० वा ठिकाण : "उषासंकुल" वीज कंपनी सेवकांची पतसंस्था, म. तिसरा मजला,सागर इंटरनॅशनल हाॅटेलसमोर, वलीपीररोड, कल्याण स्टेशनजवळ, कल्याण, प
वडगाव मावळ : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. सरकारने निधी जाहीर केल्याने भेगडे यांच्या मागणीला यश आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सुदुंबरे येथे असून, त्यांच्या स्मारकाला भरघोस निधी मिळावा यासाठी नागपूर येथे तेली समाजाच्या दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आग्रही मागणी केली होती. आज उपमुख्यमंत्री महोदयांनी स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.