Sant Santaji Maharaj Jagnade
शनिवार दि.६/१/२०१८ रोजी... जय संताजी नवयुवक मंडळ,अकोली ता, आकोट, जिल्हा अकोला... आयोजित... श्री संताजी महाराज पुण्यतिथी संपन्न झाली. या मध्ये प्रमुख अतिथी म्हणुन सन्मान दिला... मा.श्री.भुषण भिरड संस्थापक अध्यक्ष (तेली समाज महासंघ महाराष्ट्र) प्रामुख्याने उपस्थित होते...
जि औरंगाबाद सोयगांव तेली समाज आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती सोयगांव (जि औरंगाबाद ) येथे साजरी करण्यात आली यावेळी तेली समाज बांधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व तेली समाज बांधवांनी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचे कार्याचा मागोवा घेतला व संत संताजी महाराजांचाा जयजयकार केला.
श्री संताजी महाराज तेली समाज संस्था केंद्र भोर
श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी सोहळा
पुण्यतिथी सोहळा - मिती मार्गशिर्ष कृ. 14 रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी 9 वाजता.
स्थळ श्री संताजी महाराज जगनाडे सांस्कृतिक भवन, सर्व्हे नं. 78-10/1/2001
आंबाडखिंडा, वाघजाई नगर, मु. भोर, जि. पुणे
नाशिक दिंडोरी खेडगाव:दि.14 जानेवारी ' संताजी महाराज महिला मंडळ,खेडगाव' यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे तेली समाज्याचा 150 महिला एकत्र येऊन संक्रांतीच्या मुहूर्तावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सामूहिकरीत्या पार पाडतात .या कार्यक्रमात महिलांना महिला मंडळाच्या देणगी स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून घरोपयोगी वस्तू दिल्या जातात
पैठण - जगदगुरू तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांचे पैठण येथे श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा पैठण येथे भव्य मंदीर असुन तेली समाजाची भव्य धर्मशाळा आहे. धर्मशाळा सर्व लोकोपयोगी असुन या धर्मशाळेत दरवर्षी श्री. संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाचे आयोजन केले जाते. या वर्षी नाथवंशज श्रीनाथ बुवा गोसावी यांचे अमृतवाणीतुन एकनाथी भागवताचे आयोजन केले आहे.