Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक १८/०३/२०१८ रोजी गुडीपाडवा या शुभमुहर्तावर मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भव्य दिव्य कार्यक्रमला मराठा तेली समाज बांधवानी मराठमोळी संस्कृती जपत मराठी अस्मितेचा मान ठेवत मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
हनुमान जयंती निमित्त तेलीपुरा येरखेडा नागपुर येथे तेली समाजा तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने श्री सुभाषभाऊ घाटे (राष्ट्रीय अप्पर महामंत्री युवा प्रकोष्ठ नई दिल्ली, श्री मंगेशभाऊ सातपुते (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), झाडे जी , मोहनभाऊ माकडे ( माजी सरपंच भिलगाँव ) उपस्थित होते.
माण तेली समाज दहिवडी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा दहिवडी तिळवण तेली समाज संघ दहिवडी शहर यांनी आयोजित केला आहे. मिकी माघ वद्य 7 शके 1939 बुधवार दिनांक 7 2 2018 रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजता श्री संत जगनाडे महाराज मंदिर जुना शिगंनापूर रोड दहिवडी तालुका माण इथे होईल.
तेली समाजातील थोर विभूती भक्तराज श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि.4/03/18 रोजी साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहून हा महोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे हि आपणांस सर्वास विनंती करण्यात आलेली आहे.
पुण्ाे - श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड तर्फे तेली समाजातील १० वी, १२ वी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा दि.२८.०१.२०१८ रोजी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अनुसया हॉल चंदननगर येथे पार पडला त्या प्रसंगी मा. श्री. बापूसाहेब पठारे, मा. आमदार, वडगाव शेरी, विधानसभा, सौ. वसुंधराताई उबाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघोली, श्री. शिवदास उबाळे, सदस्य ग्रामपंचायत वाघोली