संताजी महाराज अभंग व संत तुकाराम
चरिता गोधन । माझे गुंतले वचन ॥1॥
आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥
तिनमुठी मृतिका देख । तेंव्हा लोपविले मुख ॥3॥
आलो म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोका ॥4॥
संत संताजी महाराजांचे अभ्ांग आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
अंगी जोडियेला मन पावनाचा ॥1॥
भक्ती ही भावाची लाट आयकली ।
शांती शिळा ठेवली विवेकाची ॥2॥
आरती संत संताजी महाराजांची गाणी
आरती संतू संता । चरणी ठेविला माथा ।
साधूवर्ण कृपावंत । अभय देई तत्वता ॥1॥
जन्मोनिया चाकणाशी । धन्य केली पंचक्रोशी ।
शरण तुकयासी जाय । धन्य धन्य देही होय ॥2॥
देहक्षेत्र घाणा जाण त्या खुणा ।
गृहस्थान जाना उखळ ते ॥1॥
सादिष्ठावरी मन पर चक्र ।
बिंदू दंत चक्र अनुदान ॥2॥
सवाध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो - संताजी महाराज मराठी आरती
सवाध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यांनो
अवघ्या जनांनो सावध व्हारे ॥1॥
काळाचिया उडी पडेल बा जेंव्हा ।
सोडविण तेंव्हा माय बाप ॥2॥