Sant Santaji Maharaj Jagnade
संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.
हडपसर : जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लेखक श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात हडपसर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
दुपारी 3 वाजता शामराव भगत यांच्या निवासस्थानी पालखी सोहळ्याचे आगमन झाले.
या वेळी संताजी तेली समाज हडपसरचे पदाधिकारी प्रितम केदारी, कुंडलीक देशमाने, अप्पा किरवे, रमेश डाफे, श्यामराव भगत, सुनील क्षीरसागर व इतर कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले.
आलेल्या वारकर्यांसाठी व भाविकांसाठी महाप्रसदांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यांना आपण संत म्हणुन पुजतो. त्या संत संताजींनी जीवापाड जपलेला हा एक संत तुकारामांचा अभंग. या विषयी आज का बोलायचे तर आपले हाय कमांड व आपण आज ब्राह्मणी धर्माकडे फरफटत निघालोत. भुतकाळाला लाथाडून जुनीच पण नवी गुलामगीरी अनंदाने स्विकारत आहोत याबदद्ल हे विचार मांडून फार मोठा बदल जरूर होणार नाही. परंतु प्रकाशाचा चांगला दिवस म्हणुन काळ्या क्रुर अंधार वाटेवर हा काजवा जरूर असेल. कारण दिप स्तंभाचे नाव घेऊन अंधार वाट तुडवत असताना कुठे तरी जाणीव जरूर होणार आहे. कारण हे तुकारामांचे विचार संताजींनी ब्राह्मणी पणाच्या छताडावर नाचुन जपलेत. हा त्याचा वारसा फक्त समोर ठेवणे हे कर्तव्य आहे. म्हणुन हे लेखन.
हे शिर्षक प्रक्षोभक, मुर्खपणाचे, बावळट पणाचे प्रतिक वाटेल. परंतु बर्याच बांधवांना हे ही वाटेल हे कदाचित सत्य असावे. आणिा या सत्याकडे आपण वळणार आहेत. देव व देवाच्या व आपल्या मधील ब्राह्मण हे आपण समजतो. देवाच्या प्रत्येक कार्यात हे बा्रह्मण्य आज तरी लागते.
पुणे :- श्री. संत संताजी जगनाडे तेली समाज संस्था सुदूंबरे या मध्यवर्ती संस्थेेची कार्यकारणी सभा फुलगांव, ता. हवेली, येथील येवले फॉर्म हाऊस मध्ये संपन्न झाली सभेसाठी पुणे, चाकण, तळेगांव, ढमढेरे, आळे लोणावळा, नगर, सोलापूर, पिंपरी चिंचवड अशा विविध परिसरातील समाज बांधव उपस्थीत होते.