Sant Santaji Maharaj Jagnade
आशा जागृत तालुक्याची जबाबदारी श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे श्री. किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे यांच्याकडे आली. श्री. दुर्गुडे यांनी तालुक्यातील परंपरेला साजेसे कार्य सुरू केले. सलग दोन वर्ष विद्यार्थी गुण गौरप समारंभ घेऊन संघटन जिव्हाळा निर्माण केला. या बळावर ते खाने समुरी करू लागले.
शिरवळ, सातारा - मधील श्री संताजी महाराज तेली महिला बचत गट व श्री संत जगनाडे महाराज तेली महिला बचत गट यांच्या मार्फत शिरवळमध्ये श्री संताजी महाराज पुण्यतिथी सजारी करण्यात आली. यामध्ये समाजातील सर्व महिला व तरुण वर्ग सहभागी झाली होती.
साकुरी :- तालुका राहाता जि. अहमदनगर येथे श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त साकुरी येथे तेली समाज बांधवातर्फे सामुदायीक अभिषेक करण्यात आला. महापुजा करून गावातून सजवलेल्या रथातुन संताजी महाराजांच्या प्रतिमेची ढोलताश्यांच्या गजरात पुढे भजनी मंडळ सर्व भगिनींनी, मुलींनी भजन म्हणत, फुगड्या खेळत भक्तीमय वातावरणात आनंद लुटला यावेळी गावात पालखी रस्त्यात सर्वत्र रांगळ्या घालण्यात आल्या होत्या. व ठिकठिकाणी समाज बांधव श्री. संपतराव लुटे व श्री. कैलास लुटे या समाज बांधवांनी सामुदायीक आरती केली. व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
चाकण :- संत संताजी तेली संस्थेच्या उद्घाटक पदी प्रविण धोत्रे यांची निवड झाली. सुदूंबरे येथे संस्थेची वार्षिक सभा झाली या वेळी सर्वानुमते श्री. प्रविण धोत्रे यांची उद्घाटक पदी निवड झाली.