Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. दिलीप फलटणकर
सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी.
![]()
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
तुझ्या वडिलो वडीली निर्धारी I चालविली पंढरीची वारी II
त्यासी सर्वथा अंतर न करी I तरीच संसारी सुफळपणा II
प्रत्येक काम वेळच्या वेळी करणारे शिस्तप्रिय असे आमचे वडील श्री. रामचंद्र महादेव रत्नपारखी (तेली गुरुजी).”येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो I हा होईल दान पसावो II येणें वरें ज्ञानदेवो I सुखिया झाला...II” हा त्यांच्या रोजच्या नित्यकर्मातील ज्ञानेश्वरी वाचनानंतरचा पसायदानाचा समारोप अजूनही कानात घुमतो आहे.
![]()
जगद्गुरू तुकाराम महाराज मुळ गाथेचे लेखनकर्ते
सदुंबरे, श्री क्षेत्र देहु नजीक, ता. मावळ, जि. पुणे
सौजन्य
श्री. मुकूंद अमृतराव चौधरी
कार्याध्यक्ष :- मुंबई महानगर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा
श्री. दयाराम हाडके
ज्येष्ठ समाजसेवक
श्री. दिलीप खोंड
संघटक तेली समाज
माधवराव अंबिके, माजी अध्यक्ष पालखी सोहळा
कै. दादासाहेब भगत (पुणे), कै. धोंडीबा राऊत (इंदुरी) आणि शरद देशमाने व श्री. माधवराव अंबिके आम्ही सर्व मंडळी ८२ भवानी पेठ, तिळवण तेली समाज कार्यालय येथे विचार विनीमयासाठी बसलो असताना संताजी महाराजांची पालखी सुरू करावी का ? असा विचार पुढे आला.
![]()
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
माझ्या कल्पने प्रमाणे श्री संताजी पालखी सोहळ्यात खालील गोष्टींची पुर्तता करण्यासाठी आपण सारे एकत्र येऊया.
१) आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व दिंड्याचा मुक्काम एका ठिकाणी व्हावा अशा मुक्कामाच्या जागा मिळवणे.