Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा विशेष अंक
82 भवानी पेठ पुणे (तिळवण तेली समाज कार्यालय) येथे. श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळात श्री. मोहन देशमाने लिखीत श्री. संत संताजी महाराज जगनाडे संपुर्ण इतिहासाचे पुस्तकाचे प्रकाशन पालखी सोहळ्यात करण्यात आले.
![]()
- मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र.
वि. ल. भावे. व संत संताजी यांचा संबंध काय ? आशा काही ज्या घटना आहेत हे जेंव्हा आपण अभ्यासू तेंव्हा संत संताजी यांचा संबंध काय ? अभ्यासू तेंव्हा संत संताजी समजण्याचा मार्ग सापडतो १८६० ते ७० दरम्यान संत तुकारामांच्या अंभंगांचे मोडीतून देवनागरी कारण करणे सुरू झाले. परंतु फक्त महिपती आपल्या लेखनात म्हणतात चाकणचा संतु तेली तुकोबासह अभंग लेखन करी परंतू या दरम्यानच्या मंडळींनी संत संताजी हस्ताक्षरातील वह्या मान्य केल्या नाहित. ही वाटचाल अशीच सुरू होती. परंतू वि. ल. भावे यांनी १९२० च्या दरम्यान फक्त संत संताजींच्या अभांगावरून तुकोबा गाथा तयार केली.
ह.भ.प. दहितुले बुवा मानव म्हणुन जगले. चार रूपये कमवुन देान रूपये इतरा साठी देत होते. अनेक गोर गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्यांनी केली. अनेक मंदिरांना त्यांनी साह्य केले. मंदिरात मुर्ती दिल्या. गरिबांची लग्ने लावून दिली अडचनीत आलेल्या संसाराला हातभार लावला पंढरपूर येथे पालखी सोहळ्यास १४ गुंठे जागा घेण्या साठी उसनवार पैसेे दिले. पंढरपुर येथे संताजी मंदिर ही उभे केले. संत संताजी जगनाडे तेली संस्था सुदूंबरे या संस्थेचे ते काही वर्ष अध्यक्ष ही होते. गाणगापूर येथे जावून त्यांनी आश्रमाची उभारणी केली.
थोड्याच काळात ते संताजी मय झाले घरी आल्यावर, तुकोबांची गाथा ज्ञानेश्वरी सुनाकडून वाचुन घेऊ लागले. हरीपाठ वाचून घेता घेता पाठ करू या ही पेक्षा ते संताजी मय झाले. यातूनच एक विचार जोपासला ते रहात असलेला परिसर पुण्या लगत परंतू तसा माळरानाचा. आपली भरपूर जागा व शेती. या परिसरात संताजी मंदिर बांधवयाचे व परिसराला संताजी नगर नाव द्यावयाचे. हा विचार घरात सांगीतला सांगताना हे ही सांगीतले मी कष्ट करेल त्या कष्टातून मंदिर उभे करेल.
![]()
पुणे :- संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचा विशेष अंक प्रसिद्ध करीत आहे. म्हणताच काही जागृत बांधवांनी प्रत्यक्ष भेटून काही बाबी स्पष्ट केल्या. सन १९८५ मध्ये नोंदणी करताना जे ट्रस्टी नमूद केले तेच ट्रस्टी आज ही धर्मादय आयुक्त कार्यालयातील नोंदीत कायम आहेत. आज तीस वर्ष या घटनेला झालेत. वयोमाना नुसार बरेच ट्रस्टी मृत्यू पावले यातील ४ ते ५ ट्रस्टी आहेत.