नागपूर:- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ८ डिसेंबर जयंती निमित्त जगनाडे चौक नागपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणी संवाद यात्रा पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.
चामोर्शी - संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज ते संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांनी समाजाला जो विचारांचा आधार दिलेला आहे, तोच आधार समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देणारा आहे. त्यासाठी प्रत्येकांनी संतांचे विचार अंगीकारावे असे प्रतिपादन युवा नेते मधुकर भांडेकर यांनी केले.
यवतमाळ - समाजातील लोकांमध्ये नाते अधिक वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने यवतमाळ येथील तेली समाजाच्यावतीने आयोजीत कौटुंबिक स्नेह मिलन सोहळा रविवार दिनांक ३ डिसेंबर रोजी यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात सर्वाधिकारी दामोधर पाटील गुरुकुल मोझरी आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मालेगाव शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त मालेगाव येथील सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर च्या नाम फलकाचे अनावरण समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निंबाजी काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होता.
फुलगाव (ता. हवेली) येथील मुख्य चौकास संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखन आणि रक्षण करण्याचे काम त्यांनी केले होते. तसेच तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये मुख्य टाळकरी म्हणून त्यांचा समावेश होता. त्यांच्या ३९९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने