चोपडा तेली समाजाची संस्था श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा व चोपडा तालुका महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा चोपडा अशा विविध संस्थांच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.
जाफराबाद आपला देश तथा महाराष्ट्र भुमी म्हणजे साधु संत थोर महात्म्यांची असुन येथे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास यशस्वी जिवन जगता येते म्हणुन त्यांनी दाखविला मार्ग त्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे मनात उच्च ध्येय ठेवुन तथा आपण आपल्या देशाच समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेतुन जिवनाची वाटचाल करावी,
फुलंब्री, ता. ८ : येथे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती साजरी करण्यात आली. विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, भाजप शहराध्यक्ष योगेश मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तैलिक महासंघाचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव दुतोंडे,
कळंब दि.८ - प्रतिवर्ष प्रमाणे या ही वर्षी संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३९८ वी जयंती तेली समाज सेवाभावी संघा च्या वतीने संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मठ कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व आरती तसेच वृक्ष रोपण लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आबा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तसेच श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ चे वतीने श्री संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथे आज दिनांक ८/१२/२०२२ रोजी श्री संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला प्रांतिक चे श्री विलासराव गिरोलकर व सौ रुपाली ताई गीरोलकर यांचे हस्ते अभिषेक करण्यात येऊन प्रांतिक जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे श्री संताजी शिक्षण मंडळा चे अध्यक्ष