Sant Santaji Maharaj Jagnade
सालाबाद प्रमाणे बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा अंतर्गत विभागीय भव्य सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयोजन २ जुन २०१५ रोजी करण्यात आल्याचे किरण मुंबईकर यांनी कोयनानगर कार्यकारीणी बैठकीत घोषणा केली. बारामती तालुक्यातुन सदर बैठकीस विभागीय अध्यक्ष पोपटराव गवळी तसेच जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजय किर्वे सह प्रविण पवार, विनय किर्वे, नितीन वाईकर, स्वप्नील दळवी, ज्ञानु दळवी सह इतर पदाधिकारी हजर होते.
श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील मातृ संस्थेची गत महिण्यात कार्यकारणी मिटींग झाली. तेंव्हा एक भयान शोकांतीका समोर आली. शोकांतिका अशी श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे ही समाज संस्था शतक महोत्सव साजरी करण्यास काही वर्ष बाकी आहे. परंतु या मातृसंस्थे द्वारे श्री संत संताजी समाधी स्थळी मोठ्या प्रमाणात स्मृती दिन साजरा केला जातो. नेहमी प्रमाणो अध्यक्षांनी संस्था कार्यकारणी समोर फलगांव ता. हवेली जि. पुणे येथे वर्षभराचा हिशोब मांडला. खर्च सात लाखा पर्यंत. देणगी व इतर मार्गाने ४ लाख उत्पन्न आता जी काही कारणे आहेत.
जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
mumbai teli samaj vadhu var melava from 2015