Sant Santaji Maharaj Jagnade
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा. शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 रोजी संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या वधु-वरांचा सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाजातील तरुण युवकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वा. रोकडा हनुमान मंदिर, नवा मोंढा, परभणी येथे समाजातील युवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
देश भर के सभी तेली समाज की सभी उपजातीयोको एकजुट करने का एक छोटासा प्रयास मात्र है
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 26 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रभरातून व्यावसायिक शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना बारा लाख रुपये एवढया रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 446 विद्यार्थ्यांना 1 कोटी 20 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.