Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 1) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
एक तेल्याचे पोर, एक शेतकर्याचे पोर, ते ही विदर्भातले, मध्यप्रदेशात तेंव्हा हा विदर्भ सी.पी.अॅण्ड बेरर म्हणुन समजला गेलेला हा भाग. निसर्गाने झिडकारलेला, शासानाने तडीपार केलेला हा भाग. आचार्य विनोबा भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती सुशील नायर सहकार महर्षी दादासाहेब देशमुख यांची कर्मभुमी या भुमीत 1 एप्रिल 1954 मध्ये खा. रामदासजी तडस यांचा जन्म झाला.
प्रकाश गिधे, म. तेली महासभा, खेड तालुका
विशेषत: सह्याद्रिच्या दर्या, खोर्यात, उजाड माळावर वसलेल्या गावात तेली समाज मुठभर वस्ती. या वस्तीतला तेली पाटला समोर हात बांधुन उभा. गावचा सरपंच दोन शब्द बोलतो ही सुद्धा वार्याची झुळूक आहे. असा अनुभवणारा समाज. आमदार किंवा खासदारांना मते देयची आसतात. त्यांची साधी भेट ही घेता येत नाही. राखीव जागेवरील पद बोगस मराठा कुणब्यांनी पळवले आहे. आशा खचलेल्या, पिचलेल्या, कोंडीत पकडलेल्या तेली बांधवांना खासदार तडस साहेबांच्या रूपाने एक संजीवनी मिळाली आहे. कारण आहेरे समजल्या जणार्या जातीतच आमदार, खासदार असतात ही आमची रोजच्या जगण्यातील वास्तवता त्यांनी संपवली आहे. लोकसंख्येने 12 टक्के असलेला हा समाज ही सत्तेचा शिल्पकार होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
- श्री. पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र, म. तेली महा सभा.
घार आकाशात उंच उंच झेप घेते. परंतू त्या घारेची नजर आपल्या घरट्याकडे आसते. त्या घारीची नजर त्या घरट्यातील आपल्या पिल्लाकडे आसते. त्यावर होणारा अन्याय, त्यावर येणारी संकटे ती येतात का पहाते. आसे जेंव्हा दिसते तेंव्हा ते उंच आकाशी गेलेली असतानाही काही क्षणात घरट्याकडे येते. आपले घरटे शाबुत करते, या साठी तडस साहेबांकडे पहावे लागेल ते प्रथम मार्केट कमीटीचे संचालक झाले. त्या नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष दोन वेळा आमदार अता खासदार झाले. ते आकाशात उंच उंच गेले परंतु आपली नजर आपल्या समाजाकडे देवून. हा समाज आहे म्हणुन ही सर्व झेप आहे. या समाजावर होणारे अन्याय या समाजावर येणारी संकटे ती दुर करणे माझे कर्तव्य आहे हे माणनारे.
श्री. शेखर मधुकरराव लगड, पिं. चि. शहर, प्रसिद्धी प्रमुख
पुणे :- महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा पिं. चिं. शहर (जिल्हा) च्या वतीने सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महासचिव मा. श्री. डॉ. भुषणजी कर्डिले, प्रमुख मार्गदर्शक प्रदेश कोषाध्यक्ष मा. श्री. गजाननाना शेलार, प्रमुख उपस्थीती प्रसिद्धी प्रमुख मा. श्री. डि. डि. चौधरी, पिं. चिं. शहर (जिल्हा ) अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंतजी ढेंगाळे, मा. श्री. निबां चौधरी, मा. श्री. मनोजजी आणेकर, मा. श्री. वंजारी, मा. श्री. पिसेसर, मा. श्री. कल्याणकर यांच्या उपस्थीतीत खानेसुमारीची आवश्यक,
स्वातंत्र्यात सर्व समाज प्रगतीवर निघाले पण तेली समाजाचे प्रश्न त्या समाजाच्या घटकाचेच राहिले. सरकारणे बाजुला फेकलेली ही माणस. गाव गाड्यात उभे रहातात ढेपाळलेली, पेंगाळलेली, मेताकुटीस आली. पण कुठे संघर्ष केला नाही. सामुदाईक पणेएकत्र येऊन प्रस्थापीत व्यवस्था उलथुन टाकली नाही हे वास्तव सत्य जरी असेल तरी. त्यांचा फार मोठा संघर्ष नजरे आड करता येणार नाही इतकी दाहकता यात आहे. याचे जिवंत उदाहरण चास कमान धरणा जवळच्या चास गावात पहावयास मिळाले. गावात शेकडो वर्ष तेली समाज शेगा खरेदी करून गाळप करीत होता.