Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील व्यक्तीमत्वे डॉ. महेंद्र धावडे (एम.ए.बी.एड., पी.एच.डी.)
हे तेली समाजाचे गाढे संशोधक, तेली समाज : इतिहास व संस्कृती या विषयावर डॉक्टरे मिळवली याशिवाय त्या समाजावर सशोनात्मक अनेक गंथ लिहिले. त्यातील प्रमुख गुप्ता बिलाँग टू तेली कम्युनिटी, कॉन्ट्रीबिशन ऑफ तेली कम्युनटी टू बुद्धीझम, व्हॉट काँग्रेस अॅण्ड बीजेपी हॅव डन फॉर ओबीसी ? आदि सांप्रत कार्यकारी संपादक : उपराधानी साप्ताहिक, नागपुर, सहसंपादक : साहू वैश्य महासभा, दिल्ली राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, राठोड तेली सन्मान प्राप्त.
मधुकर नेराळे :- मधुकर नेराळे हे तेली समाजातील श्रेष़्ठ कलांवंत. लोककला कराना त्यांचे हक्क व आधिकार मिळवुन देणाारे श्रेष्ठ व्यक्तीमत्व. ज्या काळात तमासगीर कलावंत, प्रतिष्ठित समाजात त्याज्य मानले जात, त्या काळी श्री. मधुुकर नेराळेंनी त्यांना संघटित करून आदराचे स्थान मिळवून दिले. तमाशा ही बहुजनांची कला अभंग राहुन लोकप्रिय वहावी म्हणून, ललबागला हनुमान थिएटर हा खुला रंगमंच उभारन तमाशा आणि तत्सम लोककलांना उपलब्ध करून दिला, एकेकाळी असं म्हटलं जायंच की, ढोलकी ऐकावी ती हनुमान थिएटरात, घुंगरूंच्या नाजकतीस तमाशा हनुमान थिएटर आणि मधुकर नेराळे ही नावे, मुंबईच्या कलाक्षेत्रात अनेक वर्षे पक्की निगडित आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
सध्या आरक्षण म्हणजे प्रसाद वाटल्यासारखे झाले आहे. कोणीही उठाव आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणुन आंदोलन करावीत पण हा विचार कोणी करीत नाही की ज्या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण आहेत त्यांच्या पदरात काय पडते हे कोणीच समजुन ध्यायला तयार नाहीत. मंडल आयोगाच्या शिफारयीनुसार ओबीसी साठी ५२ टक्के आरक्षण आहे केंद्रात ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण आहे. पण महाराष्ट्रत ओबीसी समाजाला १९ टक्केच आरक्षण मिळते आणि तेही प्रत्यक्षात १३ ते १४ टक्के पदरात पडते हा अन्याय नाही का ? खर्या ओबीसींचे फायदे बोगस जातीचे दाखले देवून मिळवीतात आणि ओबीसींच्या सर्व सवलती पदरात पाडुन घेतात. शाासन सुद्धा अशाच लोकांना साथ देते. जेव्हा अशा लोकाविरुद्ध तक्रार नोंदविली जाते. तेव्हा त्याचा निकाल तीन ते चार वर्षांनी लागतो. तोपर्यंत हे लोक सत्ता भोगुन कार्यकालपुर्ण करीत आलेले असतात. भारतीय संविधानाच्या ३४० व्या कलमा नुसार सर्वओबीसींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण मिळालेले आहे. अगोदरच ओबीसीची शैक्षणिक स्थिती अत्यंत मागसलेली असून मागेल त्या समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय होईल ३४० कलमाला काही अर्थ रहाणार नाही. पनवेलमध्ये प्रथमच तेली समाज मंडळातर्फे वधु-वर मेळावा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये दिनांक ३०/११/२०१४ रोजी (रविवार) मोठ्या उत्साहात पार पाडला. पनवेल येथील जय संताजी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष श्री. सतीश वैरागी यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विभागातील वधु-वर पालक व तेली संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारणी मंडळ मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.