Sant Santaji Maharaj Jagnade तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाव्दारे विदर्भस्तरीय तेली समाजाचा ३३ वा उपवधू-वर परिचय पुस्तीका "शुभ मंगलम् प्रकाशन सोहळा" संताजी मंदिर संकटमोचन रोड, यवतमाळ येथे रविवार दि. १४/२/२०२१ रोजी सकाळी ९ वा आयोजित केला आहे. दरवर्षी मंडळ मोठ्या स्तरावर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असते परंतु यंदा कोवीड-१९ या जागतीक महामारीमुळे मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले नाही.
नागपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या नागपूर शहर कार्याध्यक्ष पदावर आशिष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. महसभाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष व प्रदेश महासचिव कृष्णराव हिंगणकर आणि युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
आपल्या भारत देशात अनेक संत, महंत आणि महामानव होवून गेलेत. त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेवून नवीन पिढी घडत आहे. संत आणि महामानवांच्या विचारांतून तरुण तयार होत आहेत. परंतु अनेक असे संत आहेत की त्यांचे कार्य, विचार दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न इथल्या मनुवादी - सनातनी व्यवस्थेला टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखक - इतिहासकारांनी केलेला आहे.
कोथरूड, दि. १ - मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या श्री संताजी प्रतिष्ठानला हक्काची जागा मिळाली आणि कोथरूड परिसरात प्रतिष्ठानची इमारत उभी राहिली. त्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते पृथ्वीराज सुतार यांची साथ मिळाली. त्यामुळे सुतार यांच्या हस्ते श्री संताजी भवन या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
सुतारवाडी : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. दरवर्षी अत्यंत उत्साही वातावरणात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणात समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.