श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. काशिनाथजी यांचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. परिस्थिती जेमतेम मोलमजुरी करुन तेलघाणी व रेवडी कारखान्यात कामावर रोजंदारीने काम करुन कुटुंबाचा निर्वाह करीत असे कुटुंबात कै. दशरथराव, कै. बाबुराव, श्री. व बबनराव हे त्यांचे बंधू होते.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव किसनराव इंगळे, मा. भूतपूर्व नगराध्यक्ष अहमदनगर शहरपालिका, यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०८ मध्ये शेवगाव येथे झाला. बालपण गरिबीतच गेले. नगर येथे येऊन मोटार धंद्यांत पदार्पण केले. अनेक अडीअडचणीना तोंड देऊन या धंद्यात विशेष प्रगती केली.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१५ ऑगष्ट १९६६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वणीवर यांचा मुख्यमंत्री मा. ना. वसंतरावजी नाईक यांचे शुभहस्ते सन्मानपत्र देवून स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र माधवराव दारुणकर यांचा सत्कार करण्यात आला.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. तुकाराम भिकुजी म्हस्के, यांना जेऊरकर म्हणून हाक मारीत. शिक्षण कमी मात्र व्यापारांत हुशार. गरीबी परिस्थिती हाताळून त्यांवर मात केली. तेल घाणीचा व्यवसाय. अंबिका तेल सोसायटीत सदस्य होते. अनुभव धंद्यात चांगला, मार्गदर्शन, करडी घेण्यांत व पारखून घेण्यांत हातखंडा.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव सदोबा देवकर तेलीखुंटावर रहात. अत्यंत गरीब परिस्थितीत दिवस काढन त्यांनी त्यांचे हयातीत तीन मजली इमारत बांधली. शिक्षण इंग्रजी ५ वी पर्यंत काही वेळा ते इंग्रजीतून चांगले बोलणी करीत असत. त्यांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल अभिमान असे ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत असे.