तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
एप्रिल 2010, लेखक : श्री. मोहन देशमाने
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 3 ) एप्रिल 2010
तुमचा पक्ष कोणता ? तुमचा नेता कोणता ? या गोष्टीशी आमची बांधीलकी शुन्य कारण तुम्ही सर्व मंडळी तेली म्हणुन जेंव्हा समाज पातळीवर - येता तेंव्हा तेल्यांच्या विकासाच्या गप्पा मारता पण तेल्यांच्या विकासाच्या संधी समोर येतात तेंव्हा तुमच्या पक्ष नेत्या समोर तुम्ही गप्प आसता हे वास्तव तुम्ही किती ही लपवले तर लपत नाही. महिला आरक्षण राज्यसभेत मंजुर झालेच आहे.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 2 ) एप्रिल 2010
इतिहासात फक्त समाजमाता काकुच तेल्यांच्या पहिल्या व शेवटच्या खासदार व आमदार महिला होऊन गेल्या. त्या सुद्धा स्वत:च्या बळावर पक्षाच्या किंवा समाजाच्या नव्हे. गेली १०/१२ वर्ष लोकसभा महिलांना आरक्षण असावे असे वातावरण तापु लागले भाजपा हा ब्राह्मणी विचारांना राबवणारा पक्ष नरेंद्र मोदी जन्माने तेली असेल ? कारण या तेली बांधवाने तेल्या साठी काहीच केले नाही.
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 1 ) एप्रिल 2010
मार्च २०१० च्या अंकात तैलीकच्या पदाधिकारी मंडळीना जरा वास्तवतेचे भान करून दिले. बऱ्याच बांधवांनी फोन, प्रत्यक्ष भेटी तर काहींनी (वास्तवातेचे भान ठेवणाऱ्या कारभाऱ्याच्या बोंगळ्या कारभारा विषयी बरे लिहीले. परंतू तैलिक बरी आहे म्हणुन चुकावर पांघरून घालून कारभाऱ्यांना सावरणाऱ्या काही बांधवांनी जरा अति लिहीले हा सल्ला दिला कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा समाजाच्या नुकसानीपेक्षा फार मोठा प्रतिष्ठेचा आहे.