श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
प्रा. सोमनाथ दोधु सूर्यवंशी हे नासिक जिल्ह्यातील नामपूर गावातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९४२ ला शेतकरी कुटुंबात झाला आहे. गावात मॅट्रीक पास झाल्यानंतर त्यांनी बी. एस. सी. (कृषी) पदवी पुण्याच्या कृषि महा विद्यालयातून १९६४ ला प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर ते नोकरीला लागलेत. कृषि संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालय धुळे येथे जवळ जवळ बारा वर्षे अध्यापण व संशोधनाचे काम केले.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
अहमदनगर जिल्हा परिषद गौरवकृत आदर्श शिक्षक प्रभाकर रंगनाथ नागले उपाध्यापक, म. गांधी विद्यालय, प्रवरानगर यांचा जन्म ५ जून १९४५ रोजी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे झाला. वडील आणि थोरले बंधूपासून शिक्षकी पेशाचा वारसा लाभला. १९६५ पासून रयत शिक्षण संस्थेच्या कोळपेवाडी व प्रवरानगर येथील माध्यमिक प्रशालांमधून शिक्षक म्हणून सेवा. बालपणी घरची परिस्थिती तशीच जेमतेमच, परंतु स्वतः अत्यंत प्रयत्नवादी व हरहुन्नरी आहेत.
श्री. काशिनाथ रघुनाथ दारुणकर (कारभारी) हे नगर येथील तिळवण तेली समाजातील जुने कार्यकर्ते होय. वंशपरंपरेने समाजाचे कारभारीपद यांचेकडे आलेले असुन यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम पार पडत आले आहे वडिलांनी प्रयत्नाने गरिबीवर' मात केली.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
श्री. अंबादास व काशिनाथ पलंगे यांच्या घराण्यात पूर्वापार एैतिहासिक काळा पासून श्री. तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा मान मिळत आलेला आहे. कुलस्वामिनी तुळजापुरची भवानी माता ही उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवत. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य दैवत. श्री. छत्रपतीना भवानी मातेने आशिर्वाद देवुन महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची आज्ञा केली व हिंद धर्माचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करविली.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
दारुणकर यांचा जन्म २९-११-१९२५ रोजी झाला. त्यांनी इ. स. १९४६ पासून सार्वजनिक व सामाजिक कार्यास सुरुवात केली. नगर शहर पालिकेचे दोन वेळा अध्यक्षपद, दोन वेळा स्थायी समिती चेअरमनपद आणि १९५२ ते ७४ पर्यंत ते नगरसेवक होते. नगरपालिकेत काम करीत असताना त्यांनी अनेक विधायक व सामजिक स्वरूपाची कामे केली आहेत.