आई तुळजा भवानी माता पालखी मंदिर असलेल्या राहुरी येथे आज तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमनी संताजी महाराज जगनाङे यांची जयंती यांची प्रतिमा आणि शासनाचा आदेशाची प्रत राहुरीचे तहसीलदार तथा दंङाधिकारी मा.फैय्योद्दीन शेख साहेब यांना भेट राहुरी देताना राहुरी येथील तेली समाज बांधव आणि राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते तथा ङाॅ.दादासाहेब तनपुरे शिक्षण संस्थेचे सचिव तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आदरणीय श्री.अरुण साहेब तनपुरे यांनाही प्रतिमा भेट देण्यात आली.
नाशिक - संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून सर्व समाज कार्य ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आवाहन ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. मॅडम यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले.
दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व संताजी सेना पातूर तहसील कार्यालय येथे तसेच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.गुल्हाने साहेब यांना संताजी सेना अकोला यांच्या वतीने प्रतिमा तसेच शासकीय जी. आर.देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले. या प्रसंगी संताजी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोजदादा जुमळे,विधी आघाडी अध्यक्ष देवाशिष काकड,
दि.०२/१२/१९ दिनांक रोजी साक्री तिळवण तेली समाजाचे सर्व बांधव एकत्र येऊन साक्री शहरातले शासकीय कार्यालय येथे संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली साक्री शहरातील तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन , नगर पंचायत , पंचायत समिती, व साक्री बस डेपो व इतर सर्व कार्यालय येथे प्रतिमा भेट देण्यात आली याप्रसंगी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
दि. ०८. डिसेंबर संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्ताने व 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस या औचित्याने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तसेच अहमदनगर जिल्हा व शिर्डी शहर तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "संतांची थोरवी" निबंध स्पर्धा व "विश्वकल्याण" क्रांतिकारक व राष्ट्रभक्ती या विषयावर वक्तृत्व / भाषण स्पर्धा आयोजित केली आहे.