Sant Santaji Maharaj Jagnade
अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील होंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणाच्या शिक्षकास कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नगर शहरात सोमवार दि. २६ रोजी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक हरिभाऊ डोळसे यांनी दिली.
शिंदखेडा - तालुक्यातील दोंडाईचा शहरात बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारया नराधमास आणि त्यास पाठीशी घालणा-यांना त्वरित अटक करुन कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या ५ वर्षाच्या अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. तरी या अमाणवीय कृत्याचा सर्व तेली समाजबांधवांच्या वतीने जाहीर निषेध.
दोंडाईचा येथे एका 5 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर नराधमांनि लैंगिक अत्याचार केला. ह्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करुन कड़क शासन झाले पाहिजे ह्यासाठी 26 फेब्रूवारी २०१८ वार - सोमवार रोजी जामनेर तेली समाज महा मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
धूळे जिल्ह्यातील दोंडईचा शहरात नुतन महाविद्यालयात शाळेत तेली समाजाच्या ५ वर्षिय बालीकेवर बलात्कार करण्यात आला.त्याचा निषेध म्हणून व आरोपीवर कठोर कार्यवाही होवून फाशीची शिक्षा व्हावी व आरोपीला साथ देणार्यांना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जिल्हा बीड तसेच संताजी यूवा सेना