प्रमुख अतिथी डॉ संजय मगर, लातुर, दिनेश गावत्रे , पुणे, प्रशांत शेवतकर , अकोला सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज व माता कर्मादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
वर्धा : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धा जिल्हा कमिटीच्या सदस्या कॉम्रेड प्रभाताई रामचंद्र घंगारे यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात त्यांचे देहदान करण्यात येणार आहे.
दिनांक १८/०३/२०१८ रोजी गुडीपाडवा या शुभमुहर्तावर मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे पाडवा पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भव्य दिव्य कार्यक्रमला मराठा तेली समाज बांधवानी मराठमोळी संस्कृती जपत मराठी अस्मितेचा मान ठेवत मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय वडगाव,ता.मावळ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.