Sant Santaji Maharaj Jagnade
जळगाव - जिल्ह्यातील समस्त प्रदेश तेली महासंघ व तेली समाज बांधव, भगिनींना, युवकांना वतीने दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या जळगाव जिल्ह्यात तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब जयदत्तजी क्षीरसागर साहेब व प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय श्री विजय भाऊ चौधरी साहेब यांचे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव, गुणीजनांचा सत्कार व
अकोला, दिनांक ८ ऑगस्ट : श्री राठोड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. उदघाटक म्हणन आमदार रणधीर सावरकर होते, तर अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष बालमुकुंद भिरड होते. मार्गदर्शक म्हणून प्रशांत शेवतकर यांची उपस्थिती लाभली. यावेळी राठोड तेली समाज अध्यक्ष दिलीप नायसे, सचिव गजानन बोराळे, महिला अध्यक्ष पुष्पा वानखडे,
नुकत्याच देहू येथे उभारलेल्या स्वागत कमानीवर संत तुकाराम महाराजांच्या सोबतच्या १३ संतांच्या मूर्ती लावल्या आहेत. मात्र ज्या संतांनी संत तुकाराम महाराज यांचे साहित्य लिहिले ते तेली समाजाची अस्मिता, आराध्यदैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची मूर्ती टाळल्यामुळे तेली समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, देहू संस्थानने ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी भीमराव इंगळे यांनी देहू संस्थानकडे केली आहे.
जामनेर - येथील खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. प्रणाली चौधरी व निदान लॅबचे संचालक श्री सुबोध चौधरी यांची मुलगी कु. दिया हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर शहरातील भिल वस्तीतील अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या कुपोषित बालकांना त्यांचे वजन पूर्ण होईपर्यंत आहार वाटप करण्याचा संकल्प केला होता
नाशिक शहर तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे पार पडली. सभेचे इतिवृत्त व इतर सर्व विषय प्रवीण चांदवडकर यांनी वाचून दाखविले. आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिकसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात समाजाच्या अध्यक्षपदी मिलिंद वाघ यांची फेरनिवड करण्यात आली.