नुकत्याच देहू येथे उभारलेल्या स्वागत कमानीवर संत तुकाराम महाराजांच्या सोबतच्या १३ संतांच्या मूर्ती लावल्या आहेत. मात्र ज्या संतांनी संत तुकाराम महाराज यांचे साहित्य लिहिले ते तेली समाजाची अस्मिता, आराध्यदैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची मूर्ती टाळल्यामुळे तेली समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, देहू संस्थानने ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी भीमराव इंगळे यांनी देहू संस्थानकडे केली आहे.
जामनेर - येथील खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौ. प्रणाली चौधरी व निदान लॅबचे संचालक श्री सुबोध चौधरी यांची मुलगी कु. दिया हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेर शहरातील भिल वस्तीतील अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या कुपोषित बालकांना त्यांचे वजन पूर्ण होईपर्यंत आहार वाटप करण्याचा संकल्प केला होता
नाशिक शहर तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली श्री संताजी मंगल कार्यालय अशोकस्तंभ येथे पार पडली. सभेचे इतिवृत्त व इतर सर्व विषय प्रवीण चांदवडकर यांनी वाचून दाखविले. आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिकसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात समाजाच्या अध्यक्षपदी मिलिंद वाघ यांची फेरनिवड करण्यात आली.
तिळवण तेली समाज, पुणे ८२, भवानी पेठ, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुलाजवळ, पुणे यावर्षीही संस्थेच्या वतीने सोमवार, दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ( झेंडावंदन कार्यक्रम) मा. घनश्याम वाळुजकर अध्यक्ष, तिळवण तेली समाज, पुणे यांच्या शुभहस्ते
जामनेर - येथील निदान लॅबचे संचालक सुबोध भाऊ चौधरी व खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या जामनेर शहर अध्यक्ष सौ. प्रणाली ताई चौधरी यांची सुकन्या कु दिया सुबोध चौधरी हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवार दिनांक १ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता जामनेर येथील भील वस्तीतील अंगणवाडीतील कुपोषित बालकांना त्यांचे वजन वाढत नाही तोपर्यंत