पिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असलेली अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वर वधू सुचक मंडळाच्या माध्यमातून नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रजु झालेले डॉ. विपिनजी इटनकर यांचा सत्कार अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी समाजाचा वर वधु मेळावा घेतल्यास माझ्या कडून मदत करून मला बोलवल्यास निश्चितच होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहील.
कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आज कोरेगाव येथे मा. आमदार श्री महेशजी शिंदे, कोरेगाव - खटाव - सातारा यांची कोरेगाव येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष भेट घेतली समाजाची गेल्या काही वर्षापासूनची प्रमुख मागणी समाज मंदिरा साठी जागा व सभामंडप या दोन गोष्टी आमदार साहेबांपुढे मांडल्या गेल्या.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड या संस्थेच्या वतीने आज सौ. निशाताई यशवंत करपे यांचा पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. सौ. निशाताई करपे या गेल्या वीस वर्षांपासून समाजातील विविध संस्थांच्या उच्च पदांवर कार्य करीत आहेत. तसेच त्या समाजाबाहेरील संस्थांवरही कार्यकर्त्या म्हणून कार्य करीत आहेत.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे धुळे शहराध्यक्ष श्री राजेंद्र भटू चौधरी यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले असून ओबीसी महासंघामध्ये त्यांचे शहराध्यक्ष पदावरून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी देण्यात