सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने रविवार, दि. १० एप्रिल रोजी करंजे नाका परिसरातील महासैनिक भवन येथे राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय तैलिक साहु महासभा (नवी दिल्ली) प्रदेश तेली महासंघ - महाराष्ट्र राज्य कोल्हापूर, सांगली, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजाचा मार्गदर्शन भव्य मेळावा ठिकाण : नष्टे लॉन, बंसत बहाररोड, कलेक्टर ऑफीस जवळ, कोल्हापूर. वेळ : शनिवार दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी, सांय. 5 वा. आयोजीत केलेली आहे.
कणकवली, ता. २९ : खेडोपाडी वाहतुकीच्या साधनांची कमतरता, प्रसंगी पाच ते सात कि.मी. प्रवास करून शिक्षण घेणे अशा अनेक प्रतिकूल आव्हानांवर मात करून आपले धेय्य गाठणारी मुलेच भविष्य घडवतात, असे मार्गदर्शन मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे गोविंद कामतेकर यांनी केले.
बदनापूर - विद्यार्थ्यांना विनासायास सर्वधर्मिय जात प्रमाणपत्र काढून त्याला लॅमिनेशन करुन वाटप करण्याचा स्त्युत्य उपक्रम महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या उपक्रमाला शुभेच्छा देत मिळालेली प्रमाणपत्रे डिजिटल स्वाक्षरीने मिळालेली असून ते सांभाळन त्याचा उपयोग करण्याचे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू यांनी केले.
तेली समाज संघर्ष समिती स्थापन होवून गुडीपाडव्याला १ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या निमित्य कार्यकर्ता परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचे सुनिश्चित झाले आहे. त्या निमित्याने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ०९/४/२०२२ वेळ - सकाळी ११.०० वाजता स्थळ : संताजी भवन, उषा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती. येथे करण्यात आलेले आहे.