महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा लातूर जिल्ह्याच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली बसवेश्वर चौक येथे जाऊन महात्मा बसवेश्वर पुतळ्यास हार घालून व मानवंदना देऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले व त्यानंतर बसवेश्वर कॉलेज समोरील पुतळ्याचे हार घालून मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे आझाद चौक येथे बाळ गोपाळ यांनी महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
लातूर वीरशैव तेली समाजातर्फे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती सुभाष चौक लोखंडे बिल्डिंग येथे समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री मनमथ आप्पा लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांनी बसवेश्वर कॉलेज येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्यांना बंधू-भगिनींना यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.
प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य ( अहमदनगर जिल्हा, श्रीरामपूर शाखा) - श्रीरामपूर शहर व तालुका प्रदेश तेली महासंघ नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी निवड करणे साठी व नियुक्ती पत्र देणे साठी बेलापूर येथील साई मंदिरात मिटिंग आयोजित केली होती, या मिटिंगच्या अध्यक्षतेखाली बेलापूर येथील प्रदेश तेली महासंघ चे जेष्ठ सदस्य श्री अशोक नाना साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
जालना - श्री संताजी जगनाडे महराजांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गत रविवारपासून ( ता. १७ ) सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता रविवारी ( ता. २४ ) होत आहे.