अक्कलकुवा - अक्कलकुवा येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतीथी साजरा करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतीथी पर साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष भानुदास चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले.
घोटी - संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात घोटीत साजरा करण्यात आला. अभंगांच्या गजरात, संताजींचा जयजयकार करत समाज बांधवांनी सोहळ्यात सहभाग घेतला. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या श्रुश्राव्य कीर्तनातही भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
औरंगाबाद : गारखेड्यातील चौंडेश्वरी मंदिरात औरंगाबाद तेली समाजातर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आ.अतुल सावे, अनिल मकरिये, नीलेश सोनवणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हभप प्रभाकर बोरसे महाराज, हभप स्नेहलता खरात, लक्ष्मी महाकाळ यांनी मनोगते व्यक्त केली.गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.
जुन्नर, पुणे :- तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत तुकाराम महाराजांचे ग्रंथ लेखक संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळा नारायणगाव शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला, सकाळी सहा वाजता मंदिरात जगनाडे महाराजांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
चंद्रपूर - तेली समाज संघटनात्मदृष्ट्या मोठा आहे. त्यामुळे तेली समाजबांधव सद्धा मोठा झाला पाहिजे. समाजाला जोडायचे असेल तर तेली समाजाचे एकत्रीकरण करणे महत्त्वाचे आहे. राजकारणामध्येही समाजबांधवांना पाठिंबा दिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.