Sant Santaji Maharaj Jagnade
संत जगनाडे महाराज चौक संताजी स्मारक या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे आदरांजली देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष श्री रमेश गिरडे, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे प्रभाग 27 चे लोकप्रिय नगरसेवक हरीश डीकोंडावार संताजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष श्री रुपेश तेलमासरे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक श्री मंगेश साकरकर,
दिनांक 2/1/2022 रोजी यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा तालुका येथे तेली समाज सांस्कृतिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा तसेच संताजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा केलापुर आर्णी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संदीपभाऊ धूर्वे यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास भाऊ काळे तर प्रमुख अतिथी म्हणून संताजी शिक्षण प्रसारक मंडळ माजी अध्यक्ष डॉक्टर दीपकराव शिरभाते,
मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांच्या सयुक्त विद्यामाने आयोजित (मराठा, तिळवन, लिंगायत) तेली समाज उप वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्याचे ठरविले होते, परंतु कोरोनाचे वाढते प्रमाण व नव्यानेच शासनाने जाहीर केलेली नियमावली लक्षात घेता हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मेळावा न घेता, मोजक्याच समाज बांधवाच्या उपस्तिथीत बंध नात्याचे वार्षिक २०२२
नाशिक :नविन नाशिक तेली समाजाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. पुण्यतिथीचे औचित्य साधून नवीन नाशिकमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
पनवेल : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने टपाल नाका येथील श्री शनैश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.