Sant Santaji Maharaj Jagnade पुण्यात सुरवात झालेला मेळावा नाशीकात स्थिरावला. प्रथम खिशातले गुंतवा मग खिसे भरा हा प्रोफेशनल मेळावा प्रतिष्ठेचा झाला. मेळाव्यासाठी कार्यकर्ते स्वयंभु महाराष्ट्र भर निर्माण झाले प्रसंगी व्यवसाय, नोकरी घरदार सोडून राबु लागले. आमचा भव्य दिव्य कसा या साठी स्पर्धा सुर झाली. या स्पर्धेत एक विकृती निर्माण झाली सहज जरी मेळाव्यातील उपस्थीत मंडळी पाहिली मेळाव्यातील पुस्तीका पाहिली तर ठळक नजरेत भरेल मराठा समाजाच्या देणग्यांचा पाऊस पडू लागला आहे.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (5)
अगदी २००३ ला आसा राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसच्या शरद पवारांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी सुदूंबरे येथे मेळावा घेतला. आणी तारणकर्ते ठरणार म्हणुन मा. छगन भुजबळ यांच्या सह मा. जयदत्त क्षिरसागर यांना वाटले. पण सत्य काय याच वेळी मराठा - कुणबी ही अस्तीवात नसलेली जात निर्माण केली गेली. हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी काही लाख लागतात.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (4)
आपण आपल्या सह समाजाला ओबीसी संघर्षात आना तेंव्हा ते म्हणाले ओबीसीत दम नाही आता मला सांगा ४४ टक्के मधे तेली १० ते १२ टक्के मग या बहुसंख्य समाजाचे नेते जर संघर्षाच्या रस्त्यावरून पळुन जात असतील समाज पातळीवरील चिंतन शिबीरात संघर्षाची गर्जना देत असतील तर समाजाला या भूताबरोबर किती लढावयास लावणार. हा प्रश्न या ठिकाणाी उभ रहातो. कारण हे हाय कमांड जे बोलते तेच वाक्य जेंव्हा त्यांनी नेमलेले पदाधीकारी आगदी तसेच बोलतात तेंव्हा खर्या संघर्षा पासून समाज किती दूर आहे हे समोर येते.
घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (3)
मी २००९ साली मराठे आपले भाऊ आहेत का ? या नावाचे पुस्तक लेखन करून प्रसिद्ध केले. २०१३ साली खर्या ओबीसींवर होणारा अन्याय हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुणे येथे ओबीसी तर्फे आरक्षण बचाव अभियानांतर्गत जो मोर्चा २०-११-२०१३ काढला त्यात सुकाणा समितीचा प्रमुख होतो. मराठ्यांच्या ओबीसीतील घुसखोरी बाबत ऑगष्ट २०१३ मध्ये पुण्यात अभियान संपन्न केले. हजारो ओबीसींच्या जाहिर परिषदा महाराष्ट्रात घेतल्या. म्हणुन अधीकाराने सांगू शकतो. समाज पातळीवर फड गाजवणारी फडकरी मंडळी तेंव्हा कोठे होती ?
ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला होउ दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.