आपले सत्तेसाठी विकलेले नेते. हे आपल्या आरक्षणाला धोके ठरले आहेत. हे जसे सत्य आहे. तेवढेच महाराष्ट्राच्या स्थापने पासून सत्तेत व विरोधात हाच मराठा समाज आहे. फुले, शाहू, अंबेडकरांचे नाव सांगून त्यांची समता, स्वातंत्र्य व त्याग आज मलिन केला गेला आहे. प्रथम जाती पाहून तिकीट वाटप व सामदाम, दंड फोडा व झोडा आशा तंत्रांचा वापर करून विजयाची घोडदौड. मते हवीत पण यांच्या विकासाचा मुद्दा येताच या मंडळीनी आपल्या हितासाठी खेडोपाड्यातील गरिब मराठा व ओबीसी यांच्या मध्ये कलगी तुरा आसा सामना लावून गरिब मराठ्यासाठी लढतो हे बुजगावणे उभे केले. ना यांना गरिब मराठ्यांचे प्रेम ना ओबीसी अस्था. कारण घटने नुसार आरक्षण देता येत नाही हे सिद्ध झालेच आहे. पण लढाई जुंपुन तोंडाला पाने पुसण्याचा हा सर्व प्रकार महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूकी दरम्यान सुरू आसतो. मराठा समाजातील काही राजकीय व्यक्ती आमदार खासदार होण्यसाठी मराठा हा मुद्दा घेऊन वाजवत ठेवतात. कारण याच बळावर मराठा सत्तेत जास्त येतो हे गणित मांडले जाते यासाठी ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली. कमिटी या देशाच्या संविधानाला बांधील नसते तर बांधील आसतो आयोग म्हणून आयोग कायदेशीर व कमिटी ही दांडगाई.
महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी घटक असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव २७ एप्रिल २०१२ रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे सल्ल्यासाठी पाठविण्यात आला आहे. असे लेखि उत्तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डी. नेपोलियन यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी लोकसभेत दिले आहे.
हे सदर मुळात तेली मताचा आवाज आहे. हा आवाज अनेकांना खटकतो हा आवाज अनेकांना परिवर्तन करावयास लावतो. हा आवाज आत्मसंशोधन करावयास लावतो हा आवाज काही फुकट फौजदारांना समाज पातळीवर धावपळ करावयास लावतो. आणि हा आवाज हजारो बांधवांना आपला वाटतो. त्यांच्या मनातील त्यांच्या वेदनांना वाट करून देतो म्हणुन प्रत्येक महिन्याचा अंक मिळताच शेकडो समाज बांधव साथ सोबत देतात. पण हे ही आमचे मत आहे. आम्ही मांडलेले विचार हे पुर्ण सत्य आहे आसे नव्हे यातील उनीवा अजुन सत्य सांगा. मुळात या आवाजा विषयी चुक स्पष्टीकरण किंवा विरोधी मते कळवा. त्यांना प्रसिद्धी देऊ. गाव गप्पा तोंडी विरोध किंवा कुणीतरी सांगीतले म्हणुन मत सांगणे याला किंमत शुन्य कारण हा आवाज मुद्रित केलेला आहे. तेंव्हा आपल्या विचार प्रणाली प्रमाणे मते पाठवा त्याला ही प्रसिद्धी देऊ आता मुळ विषयाकडे वळु.
परवाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या देशाच्या हाजारो वर्षातील इतिहासाला वेगळी कलाटणी देऊन जन्माने ओबीसी असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मोदी व त्याचा भाजपा त्या भाजपावरील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अंकुश. तो अंकुश ठेवणारी जन्माने ब्राह्मण असलेली मंडळी. या मंडळींचा हजारो वर्षा पासुनचा लबाडीचा धंदा मी याच सदरात उघड केला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या नंतर राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेस व कॉंग्रेस च्या शरद पवारांना बेंबिच्या देठा पाासून जे वाटते ते बाहेर पडू लागले. त्यांच्या या मराठा प्रेमा समोर दारूण पराभव होऊन सुद्धा ओबीसींचे तारणकर्ते म्हणुन मिरवणारे खरे कारण स्पष्ट जेंव्हा करताना दिसले नाहीत तेंव्हा ओबीसी एजंटांची किव करावी वाटली व पवारांच्या मराठा प्रेमाची कदर करावी वाटली म्हणुन हा पत्रप्रपंच.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री मराठा समाजाचे आहेत. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापसून ७५ % मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. अधिकारी पदाधिकारी सत्तासरकार मराठा समाजाचे आणि आता यांना ओबीसी मध्ये आरक्षण हवे. ओबीसी मध्ये आरक्षण दिले तर खरे ओबीसी उध्वस्त होतील का नाही ?