Sant Santaji Maharaj Jagnade
चाकण :- श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दर वर्षी मोठ्या प्रमाणात तेली समाज बांधव सुदूंबरे येथे येतात.
या वर्षी २० डिसेंबर २०१४ रोजी श्री. संताजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांचे बंधु मा. श्री. सोमभाई मोदी हे संताजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने सुदूंबरे पुणे येथे आले होते. त्यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
रविवार दि. 18/1/2015 रोजी सकाळी 11.00 वाजता
स्थळ - साईलिला गार्डन मंगल कार्यालय, हेमंत हायवे ढाब्यासमोर, पुणे-नाशिक रोड,
(आळेफाटा) ता. जुन्नर, जि. पुणे
Email.: hemantwavhalin@gmail.com
पुणे :- पुणे कॅम्प मधील ह्या वयोवृद्ध समाज माता त्यांचे वयोमानानुसार निधन. कै. केशर काकु यांच्या त्या भगिनी होत्या. कै. काकु, श्री. जयदत्त क्षिरसागर यांच्या नात्यातील व रक्ताच्या असुनही आपले मध्यम वर्गीय जीवन त्या आनंदाने जगल्या अत्यसंस्कार समयी मा. जयदत्त क्षिरसागर, सौ. प्रिया महिंद्रे, श्री. विजय शिंदे अध्यक्ष पुणे समाज उपस्थित होते.
इंदापूर (प्रतिनिधी) :- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील तालुका तेली समाज महासभा श्रीसंत संताजी महाराज जगनाडे ट्रस्ट व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संताजी महाराज पुण्यतिथी उत्सव आगळ्या वेगळ्या
व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला नव्हे हा उत्सव सोहळा म्हणजे समाजाला एक नवी दिशा देणारा ठरावा असा झाला.
श्री संत संताजी जगनाडे महाराजाच्या ३१५ व्या पुण्य तिथी सोहळ्यामध्ये राहुरी कॉलेजचे प्रा. डॉ. सुधाकर चौधरी यांनी लिहीलेल्या अप्लाईड झुलॉजी व ऍनीमल सिस्टीमॅटीक्स या पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांतिक तेली समजाचे कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुषण कर्डिले, नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, बानार समितीचे सभापती अरूण तनपुरे, तेली समाजसेवक साप्ताहीकाचे संपादक प्रा. वसंतराव कर्डिले स्नेहीजनचे संपादक छगन मुळे, तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ डोळसे तालुका तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे सदाशिव पवार, संजय पन्हाळे, संदीप सोनवणे, वाय. एस. तनपुरे उपस्थीत होते.