Sant Santaji Maharaj Jagnade
आज दक्षिण टोका कडून उत्तर टोका कडे आलेले श्री. अनिल कहाणे यांचा प्रवास सहज सोपा जरूर नाही. पण अशक्य नाहीच स्वत:च स्वत:चे नशीब बदलु शकतो हा आदर्श जरूर घेतला पाहिजे. राजगुरू नगर येथील तेली समाजात सक्रीय राहुन सामाजीक प्रश्न सोडविण्यात त्यांना आनंद वाटतो
पुणे - गणेश जयंती निमित्त तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव समिती तळेगाव दाभाडे यांनी सर्व समाज बांधवांच्या लोकवर्गणीने श्री गणेशाला चांदीचा एक किलोचा हार व अलंकार अर्पण केला.
पिंपरी चिंचवड तेली समाज :- पिंपरी या परिसरातील श्री सचिन काळे यांची नियुक्ती तेली महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी झाली जिल्हा अध्यक्ष श्री. संदिप चिलेकर यांनी नुकतेच अधीकार पत्र दिले. या प्रसंगी श्री. विजय रत्नपारखी विभगीय अध्यक्ष, श्री. रमेश भोज कार्याध्यक्ष श्री. संदिप चिलेकर जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप शिंदे विभागीय सचिव व इतर बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला.
पेण :- येथिल तेली समाज सेविका सौ. चंपाबाई उर्फ मंगला वैरागी यांचे पनवेल येथे दि. १०/१/२०१५ रोजी हृदय विकराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. भाव, भावना व अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम असणार्या सौ. चंपाबाई यांचे जन्मग्राम पनवेल असुन येथील प्रसिद्ध पन्हाळे कुटूंबातील स्व. आबासाहेब पन्हाळे, माजी पनवेल नगरपालिका अध्यक्ष आणि माजी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष यांची ती पुतणी होती.