सर्व स्नेही मित्र मंडळीस आग्रहाचे निमंत्रण आहे की, कारंजा (घाडगे) जि. वर्धा तालुक्यातून दहावी व बारावीचे परिक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक व प्र्शंसा करणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे. हेच भान ठेवून अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
चिंचपुर तसे ता. आष्टी, जी. बीड मधील परंतु वावर सध्या जामखेड मधेच गावात थोडी शेती. शेती पहात पहात गुरांचा व्यपार करू लागले बीड, जामखेड, गेवराई, नेकनुर कडा आष्टी, घोडेगांव, मिरज, सांगली, सातारा येथे जनावरांची खरेदी विक्री करित होेते. यातुन अनुभव विश्व वाढले सन 1975 मध्ये शिव संभो दुध उत्पादक स. संस्था स्थापन केली ही आष्टी तालुक्यातील पहिली दुध डेअरी ठरली आहे. सायकल वर 75 किमी नगर पर्यंत जावुन ते सुरवातीला दुध विक्री करित होते. हालाखीची परिस्थिती त्यांनी बदलली त्यांना 1) महादेव, 2) सुरेश 3) रमेश, 4) मनोज ही मुले आप आपले व्यवसाय यशस्वी पणे संभाळत आहेत. चिंचपुर येथे समाजाचे एकच घर आहे. प्रस्थापीतांच्या विरोधात गावचे सरपंच पद 10 वर्षे संभाळले. आज एक सुन गावची उपसरपंच आहे. आज दुष्काळ आहे. याची जाणीव ठेऊन पंचक्रोशी साठी 1500 जनावरांची छावणी सुरू केली आहे.
समाजिक कार्याची आवड असल्यामुळे समाजाचे काम करण्याची संधी मिळाली व शिर्डीत मोठा तेली समाज असल्यामुळे सांघीक वातावरण तयार झाले. पुढे तालुका संघटनाचे काम चालु झाले त्यात मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. ती मी जबाबदारीने पुर्ण करत आहे. आज नगर जिल्ह्यात राहाता तालुक्याचे काम मोठ्या आघडीवर आहे. संताजी महाराजांची दिनदर्शिका आम्ही चार वर्षापासुन करत आहोत. प्रतिमा पुजन, नविन उपक्रम चालु केला त्यात सुद्धा यश मिळाले
" तुर्कस्तानातील "घुरीड" घराण्यातील "महमद घोरी" या तुर्की" आक्रमकाकडून पराभूत झालेल्या "सका/शक/Scythian" वंशाच्या अनेक क्षत्रिय लोकांनी या आपत्तीच्या काळात "तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" असे व्यवसाय स्वीकारले.
"सका/शक/Scythian" वंशाच्या,राजपूत घराण्यातील, "कनोज" येथील ज्या "राठोड" लोकांनी "तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" हा व्यवसाय स्वीकारला ते "तेली राठोड" म्हणून ओळखले जाऊ लागले.
जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे दिनांक १२-०६-२०१६ ला सकाळी १०.०० वाजता वर्ग दहावी आणि बाराव्या मध्ये अनुक्रमे ९० आणि ८५ टक्केवारी प्राप्त तेली समाजातील विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या तेली समाजातील विद्यार्थ्यांना वरील प्राप्त गुण असल्यास त्यांनी जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर या संस्थेशी संपर्क साधावा.