वर्धा माझे माहेर पण अाता माहेर राहिलेलच नाही आम्ही दोघेच भाऊ बहिण, आई, बाबा, भाऊ, बहिणी सर्वच गेले त्यामुळे माहेरी कुणीच नाही पण माहेर या शब्दात खुप ओलावा प्रेम, सद्भाव, शक्ती सार काही समावलेल आणि हे माहेरपण अनुभवायला मिळालं रामदासजी तडस यांच्याकडे.
अनेक समस्यांनी ग्रस्त असलेलेव हजारो कोटींच्या कर्जाचा बोजा असलेले ऊर्जाखाते बावनकुळे यांनी अतिशय खंबीरपणे गेल्या दीड वर्षात प्रगतीपथावर नेऊन राज्यातील शेतकर्यांना, सामान्य ग्राहकांना व उद्ोजकांना चांगल्या स्वरूपात लाभ करून दिला आहे. मंत्री बावनकुळे यांनी सर्वसामान्यांची कामे तळमळीने व प्रमाणिकपणे तडीस नेली आहेत, त्यामुळेचतेली समाजाला बावनकुळे यांच्याबद्दल आदर आहे. घराच्या लोकांचा पाठींबा व कौतुकांची थाप पाठीवर असावी, जेणेकरून तेली समाजातील हे नेतृत्व आसेच दिवसेंदिवस राज्य व देश पातळीवर प्रगती पथावर रहावे ही सदिच्छा व्यक्त करून जिल्ह्यातील समस्त तेली समजातर्फे त्यांना कर्तृत्वाचे सन्मानपत्र देण्यात आले.
संघटक :- सौ. निलम अनिल घाटकर, मौर्यविहार, ओ/2, कोथरूड, पुणे - 38, मो. नं. 9890076851
आमच्या उत्कर्ष नावाची कन्या सन 2001 मध्ये उदयास आली. या कन्येचे पालक सुरूवातीला अवघ्या 15 महिला होत्या सुरूवातीला 200/- इतके पालकत्व मिळत होते. परंतु या उत्कर्ष भिशी मध्ये आता या कन्येचे पालकत्व स्विकारण्यासाठी रूपये 2000/ प्रति महिना असे झाले आहे. आता जवळ जवळ 50 महिलांनी पालकत्व स्विकारले आहे. या मध्ये कोथरूड, कर्वेनगर, वारजे या भागातील महिला सहभागी झालेल्या आहेत. दरमहिन्याच्या 10 तारखेला उत्कर्ष महिला भिशी वाढदिवसा निमित्त भिश फोडली जाते.
पुणे :- श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या समाजाच्या शिखर संस्थेच्या सहचिटणीस पद नुकतेच रिक्त होते. संस्थेच्या कार्यकारणीची मिटींग श्री संत संताजी मंदिरात नुकतीच संपन्न झाली या वेळी संस्था अध्यक्ष श्री. जनार्दन गोपाळ शेठ जगनाडे यांनी श्री. दिपक सदाशीव पवार यांची नियुक्ती सहचिटणीस पद केली आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग3)
सरडाच रंग बदलतो असे नाही. जेंव्हा जेव्हां मी म्हणजे मीच ही भुमीका राजा व धर्म शास्त्राला येते तेंव्हा तेंव्हा दबलेला पिचलेला समाज पर्यायाकडे नजर ठेऊन आसतो. हा समज पर्याय स्विकारतो हा या देशाचा इतिहास आहे. म्हणुन गौतम बुद्धाने समता, बंधुभाव व स्वातंत्र्य म्हणजे धर्म ही जाणीव करून दिली त्या वेळी बुद्धधर्माचा स्विकार करणारे जेजे कोण होते त्यात प्रथम तेली व नाभीक समाजातील होते. शेकडो वर्ष हा धर्म नांदत होता.