Sant Santaji Maharaj Jagnade
छत्रपती संभाजीनगर, दि. १५ - अखिल भारतीय तैलिक महासभा, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मनोज संतान्से यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय महासचिव रामलाल गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
छत्रपती संभाजीनगर: विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेली समाजातील महिलांचा नुकताच राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रारंभी, तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सावे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार हे महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असून,
शिर्डी - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. विक्रांत वाघचौरे यांना विधी क्षेत्रात, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स
शनिवार, दि. १ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : प्रमिला ताई ओक हॉल, बस स्टँड जवळ, अकोला टिप : कार्यक्रम स्थळी सर्व सन्माननिय समाज बांधव व भगीनींसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विनीत : तेली समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजन समिती
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तेली समाज छत्रपती संभाजीनगर वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाज कर्तबगार महिला गौरव समारंभ व तेली समाज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज भगिनींचा गौरव व्हावा व त्यांची प्रेरणा समाजातील इतर महिलांनी घ्यावी तसेच तेली समाजाचे संघटन