औरंगाबाद : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कैलासनगर येथे अभिवादन करण्यात आले. संत जगनाड़े महाराजांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. संतोष सुराले, सुनील क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रदेश तैलिक महासंघ महाराष्ट्र राज्य आयोजित औरंगाबाद जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा -२०२२ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सां.६.वा. रविवार दि.१३ फेब्रुवारी २०२२, मेळाव्याचे ठिकाण : श्रीहरी पॅव्हेलियन शहानुरमियाँ दर्गा चौक, संग्रामनगर उड्डानपुलाशेजारी, औरंगाबाद संपर्कासाठी व कार्यालय पत्ता : कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय..०० पर्यंत
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा समाज जोडो अभियान अंतर्गत समाजमाता कै.केशरकाकू यांचे बीड नगरीत भव्य स्वांगत आ. संदिप क्षिरसागर आणि समाज बांधवांनी केले.समाजमाता माजी खासदार कै. केशरकाकू सोनाजीराव क्षिरसागर यांचे निवासस्थान संत संताजी महाराज पादुका व गाथाचे पूजन धार्मिक विधीने क्षिरसागर कुटुंबीया कडून करण्यात आले.
औरंगाबाद संताजी जगनाडे महाराज यांची हस्तलिखित गाथा, पादुका व मूर्ती ठेवलेली रथयात्रा मंगळवारी (२१ डिसेंबर) शहरात दाखल झाली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे समाज जोडो रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे येथून निघालेली यात्रा राज्यभर जनजागृती करीत आहे.
तेली समाज सेवक मंडळ अंतर्गत व तेली समाज यांच्या सहकार्याने, भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा, औरंगाबाद (संभाजीनगर) रविवार दि.२७/०२/२०२२ रोजी सकाळी १० ते सायं.६ वाजे पर्यंत संपर्क कार्यालयः अक्षयदिप प्लाझा, टाऊन सेंटर, सिडको एन-१, सिडको बसस्थानकाजवळ, औरंगाबाद