छत्रपती संभाजीनगर, सकल तेली समाज व तेली सेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्यस्तरीय तेली समाज वधू वर संपर्क मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राज्यभरातून विवाह इच्छुक वधू वरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, सदरिल मेळाव्यात ३७५ तरुण तरुणींनी नाव नोंदणी केली.
छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
विहामांडवा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालयात संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची 399 जयंती करण्यात आली. साजरी जयंती निमित्त संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, अंगद भिंगारे महाराज यानी संत शिरोमणी जगनाडे ची महती सांगितली.
जवळा - तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे वारकरी संप्रदायातील श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे जवळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णाजी बडवे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज पारनेर उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवन चरित्रा बद्दल आपल्या भाषणातून सांगितले.
दिनांक ८ डिसेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम कन्नड शहरात आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास आपली, आपल्या संपूर्ण परिवाराची उपस्थिती प्रार्थनिय आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे या सोहळ्यास आपल्या घरातील लहान-मोठ्या प्रत्येक सदस्याची उपस्थिती प्रार्थनिय आहे.