श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने शेगाव येथे नुकतेच तेली समाजाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कॅट संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तसेच चेलीपुरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कचरू वेळंजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
जालना- बॉम्बे फोटो स्टुडिओ चे संचालक प्रेस फोटोग्राफर सामाजिक कार्यकर्ते अतुल (राजु) बाबुराव व्यवहारे यांची तेली सेने च्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदेश अध्यक्ष डॉ. विठ्ठल रणबावरे व संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नियुक्ती केली आहे.
छ. संभाजीनगर संपर्क कार्यालयः शॉप नं. ३, अक्षयदिप प्लाझा, सिडको बसस्टँडजवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मो.9922234621
लातूर : वीरशैव तेली समाज लातूरच्यावतीने आज श्री महात्मा बसवेश्वर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी मातोश्री लॉनवर स्व. देवीदास बाबुराव साबणे नगरी येथे उत्साहात संपन्न झाला. खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.