श्री. प्रकाश भोज, अध्यक्ष तेली समाज विजापूर कर्नाटक
मचाले घराने मुळ बारामती जवळचे, व्यवसायामुळे हे घराने विजापूरात स्थीर झाले. विजापूर परिसरात करडी व शेंग पीक अमाप पिकत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तेली घराणी इथे स्थिरावली होती. मचाले यांच्या घरात 30/40 घानी होती. तेवढेच घानेकरी कामाला होते. शहरात मचाले हे प्रतिष्ठीत घराने होते.
गणेश पवार, औरंगाबाद मो.9096983232
देशाच्या राजधानीत, ऐतिहासिक दिल्ली शहरात येत्या 2 जून रोजी तेली समाज बांधवांचा आवाज बुलंद होतोय. तेली समाज बांधवाच्या भव्य दिव्य रॅली आयोजन 2 जून रोजी करण्यात आले आहे. तेली समाज देशाच्या कानाकोप-यात विखुरलेला आहे आणि या समाजाच्या अनेक प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी या रॅलीचे महत्व काही वेगळे राहील.
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळा दोंडाईचा. "खान्देश तेली समाचार गृप" च्या वर्धापन प्रथम वर्धापनदिनानिमित्त. दि.21/10/2018.रविवार रोजी दोंडाइचा येथे गृपच्या वतीने "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार" प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सन्मान ट्राॅफी ,शाल,श्रीफळ,पुष्पहार ,प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.ह्या कार्यक्रमात सत्कार स्विकारतांना लोहारा ता.पाचोरा जि.जळगांव. येथील गृपचे पत्रकार मा.सो.श्री. दिपक वामन चौधरी.सोबत मुख्य संपादक - मा.सो.श्री.प्रकाश काशिनाथ चौधरी.दोंडाईचा.(काळा कोट घातलेले) याप्रसंगी, भोपाल M.P तेली पंच मंडळाचे सचिव,
औरंगाबाद - तिळवण तेली समाज जनगणना अभियानास शहर तसेच जिल्ह्यात समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभियान राबवणारे कार्यकर्ते माहिती संकलन करण्यासाठी घरोघरी भेटी देत आहेत. जनगणनेचे अभियान अंतिम टण्यात सुरू आहे. तसेच समाजाच्या माहितीपुस्तिका तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. याबाबत माहिती संकलन करण्याची अंतिम मुदत १० डिसेंबरपर्यंत आहे.