प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समस्त निमित्त तेली समाज सोयगाव, औरंगाबाद यांनी जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रम गुरुवार दिनांक 3/1/2019 रोजी रात्री साडेआठ वाजता संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे ठिकाण श्री दत्त मंदिर समोरील प्रांगण, नारळीबाग सोयगाव जिल्हा औरंगाबाद हे राहिल.
पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक Whatsapp ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी Whatsapp ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत.
औरंगाबाद : तेली सेनेच्या वतीने जगनाडे महाराज आयटी पार्कमध्ये तेली समाजातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आयटी पार्कचे अध्यक्ष विश्वनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. ह भ प बापूराव सोनवणे, भगवान बागूल, विजय गवळी, डॉ.उज्वल करवंदे, सुनीता मचाले, बबिता राऊत यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन गणेश पवार यांनी केले. आभार पवार यांनी मानले,
पैठण - संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांच्या सूचक कल्पनेतून गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यावेळी पैठण नगर परिषद अध्यक्ष दत्ता गाडे, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद संदलंबे , उपाध्यक्ष देशमुख महाराज आळंदीकर,