जाऊ संताजींच्या गावा .. !
श्रावण मास श्री संताजी महाराज जगनाडे समाधी मंदिर सुदुंबरे येथे ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन व किर्तन सोहळा. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दु.१२ ते १ गाथा भजन सायं.४.३० ते ५.३० हरिपाठ, ५.३० ते ७ संगीत भजन व रात्री ७ ते ९ हरिकिर्तन व नंतर हरिजागर होईल. प्रारंभ मिती श्रावण वद्य.10. रविवार दि. 25/8/2019 तर सांगता मिती श्रावण वद्य.१३.बुधवार दि.२८/८/२०१९ रोजी होईल
औरंगाबाद काही दिवसांपूर्वी काचीवाडा येथील तेली समाज भगिनीला मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या युवकाने शिवीगाळ करून धक्का बुक्की केली होती व त्यांच्या मुलालाही मार लागला होता.सदरील घटना समजताच तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार व सुनिल क्षीरसागर यांनी सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंनगारे यांना भेटुन आरोपीला लवकरात लवकर अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली होती
सन २०१९ शासन मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक , दिनांक:-.२६ डिसेंबर २०१८ च्या ठरावानुसार विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी कार्यालय विभागात / जिल्ह्यातील शासकीय कार्यालय / निमशासकीय कार्यालयात ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी असे शासनाच्या वरील प्रपत्रकानुसार निर्देशित केले आहे.
श्रीरामपूर तेली समाज - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दि. ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांनी जयंती साजरी झाल्यानंतर संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा कार्यालयात दर्शनी भागात लावावी, अशी मागणी पत्रकाद्वारे श्रीसाई संताजी प्रतिष्ठान शिडी, अहमदनगर यांनी केली आहे. संबंधित कार्यालयाला श्री संत जगनाडे महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.
तेली समाजातील महान विभुती (भाग 8) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
संताजी महाराजांना तेली समाजाने आपले दैवत म्हणून स्विकारले आहे. तुकाराम महाराजांच्या 14 टाळकर्यांपैकी सर्वात महत्वाचे शिष्य असा त्यांचा लौकिक आहे. ते तुकारामांसोबत कायम सावली सारखे असत. संताजी जगनाडयांमुळेच तुकाराम लोकांना कळले. म्हणुनच म्हणता, होता संताजी सखा म्हणून वाचली गाथा आणि कळला तुका.