औरंगाबाद माजी ऊर्जामंत्री, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर संधी देऊन तेली समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व तेली सेनेतर्फे गडकरींना निवेदन देण्यात आले.
आहेरा ऐवजी वधू-वर पालकानांं रक्कम देण्याचे आवाहन
औरंगाबाद नववर्षात तेली समाजातील विवाह सोहळ्यात टोपी-टॉवेल आणि आहेर देऊ नये, याऐवजी रक्कम पालकांना द्यावी, असा संकल्प महाराष्ट्र राज्य तेली समाज विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकरांनी जाहीर केला. या घोषणेनंतर लगेचच प्रतिसाद मिळाला.
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शनिवार दिनांक 12-10-2019 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिद्धी संकल्प लॉन्स मंगल कार्यालय नगर मनमाड हायवे साकुरी तालुका राहता शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर वधू-वर पालक परिचय मेळावा पूर्णतः मोफत आहे. संपर्क कार्यालय व फॉर्म शिकण्याचा पत्ता साई संताजी प्रतिष्ठान होटेल एक्झिक्युटिवे इंन युनियन बँकेच्या वर गोंदकर पेट्रोल पंपासमोर नगर मनमाड हायवे शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर 9890279008, 9422191544, 7972147109
आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात.
आई तुळजाभवानीच्या सर्वच प्रथा परंपरा या जगावेगळ्या असून त्यात सर्वसमावेशकता आहे. अहमदनगरजवळील बुर्हाणनगर हे तुळजाभवानीचे माहेर म्हटले जात असल्याने त्याठिकाणचा जानकोजी तेली हा तिच्या पित्यासमान मानून माहेरवासिनीचा सन्मान म्हणून सीमोल्लंघनासाठी तुळजाभवानीची मूळ मूर्तीची मिरवणूक ही याच तेल्याच्या पालखीतून काढली जाते. हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आल्याची माहिती पालखीचे मानकरी अॅड. अभिषेक विजयराव भगत यांनी सविस्तरपणे कथन केली. विशेष म्हणजे ही परंपरा चालविणारे ते ३० वे वंशज आहेत.