श्री. संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा, पैठण तर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त विविध पैठण येथील विविध शासकीय कार्यालयाना श्री. संत संताजी महाराज जगानाडे यांची प्रतिमा व श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याच्या जिआर ची शाासकीय प्रत देण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष विक्रम हरिभाऊ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ दादाराव सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव नाथुजी बरकसे, सचिव भगवान कोंडीराम मिटकर तसेच इतर कार्यकर्ते देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत श्री जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना 8 डिसेंबर ला निघणार भव्य दिव्य टू व्हीलर रॅली,संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन मनोज संतान्से यांच्या संपर्क कार्यालय नारळीबाग येथे आज करण्यात आले होते.या वेळी विचार मंथन करून संतश्री जगनाडे महाराज उत्सव समिती स्थापन करून टू व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
परळी - श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.सदबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते.
जय संताजी ,
कै.दादातेली-हरितेली यांच्याप्रमाणेच त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन , ' व्यक्ती पेक्षा समाज श्रेष्ठ ' हे मतप्रमाण मानत सामाजिक एकोपा जोपासला जावा ह्याकरिता श्री क्षेत्र पैठण येथे संताजी युवक तेली महासंघाच्या माध्यमातून श्री. सोमनाथ बद्रीनाथ सर्जे यांच्या पुढाकाराने मागील पंधरा वर्षांपासून समाजातल्या प्रत्येक घटकांचे विकासाभिमुख ध्येय व धोरणात्मक सामाजिक हित जोपासण्याचे काम आम्ही आज वर करत आलो आहोत
पैठण दि 13/1019 रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली धर्मशाळा येथे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात पार पडली, सभेला सर्व सभासद उपस्थित होते. सभेत सर्व विषयावर चर्चा होऊन ,अधक्ष, उपाध्यक्षय, तसेच सर्व संचालक मंडळ यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली, अधक्ष्य श्री विक्रमशेठ सर्जे उपाध्यक्षय श्री केदारनाथ सर्जे कोषधक्ष्य श्री यशवंत राव बरकसे सचिव श्री भगवान मिटकर सह सचिव