आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात.
आई तुळजाभवानीच्या सर्वच प्रथा परंपरा या जगावेगळ्या असून त्यात सर्वसमावेशकता आहे. अहमदनगरजवळील बुर्हाणनगर हे तुळजाभवानीचे माहेर म्हटले जात असल्याने त्याठिकाणचा जानकोजी तेली हा तिच्या पित्यासमान मानून माहेरवासिनीचा सन्मान म्हणून सीमोल्लंघनासाठी तुळजाभवानीची मूळ मूर्तीची मिरवणूक ही याच तेल्याच्या पालखीतून काढली जाते. हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आल्याची माहिती पालखीचे मानकरी अॅड. अभिषेक विजयराव भगत यांनी सविस्तरपणे कथन केली. विशेष म्हणजे ही परंपरा चालविणारे ते ३० वे वंशज आहेत.
राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाजातील तरुण युवकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वा. रोकडा हनुमान मंदिर, नवा मोंढा, परभणी येथे समाजातील युवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बीड जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वषीं तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रिय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी सर्व सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी मधील ज्या उतीर्ण विद्याथ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व पालकाचा पत्ता,संपर्क क्रमांक देवून आपले नाव नोंदणी करावी.
राज्यात आज अनेक संस्था विविध उपक्रमांतून समाजाची सेवा करत आहेत. त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे. अशा संस्थांचा संताजी सेवक संस्थेच्या वतीने गौरव करून त्यांना त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहे,' असे प्रतिपादन पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देशमाने यांनी केले. पुणे येथील श्री संताजी सेवक संस्थेच्या वतीने अहमदनगरच्या तिळवण तेली समाज ट्रस्टला उत्कृष्ट संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार अध्यक्ष मोहनराव देशमाने यांच्या हस्ते सचिव प्रभाकर देवकर व खजिनदार प्रसाद शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रभाकर देवकर, प्रसाद शिंदे आदींची भाषणे झाली.