उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे जत्रा फंक्शन हॉल येथे चंद्रशेखर घोडके हे यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील रामेश्वर घोडके आई शोभा घोडके यांचा प्रमुख पाहुणे जेष्ठ मार्गदर्शक कोंडप्पा कोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला.
शेवगाव तालुका संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी येथील गोपाळ शिदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू असे शिदे यांनी सांगितले.
शिंदखेडा - तालुक्यातील दोंडाईचा शहरात बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारया नराधमास आणि त्यास पाठीशी घालणा-यांना त्वरित अटक करुन कठोर कार्यवाही करावी, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरातील नूतन महाविद्यालयात तेली समाजाच्या ५ वर्षाच्या अल्पशा मुलीवर अमानुष बलात्कार झाल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. तरी या अमाणवीय कृत्याचा सर्व तेली समाजबांधवांच्या वतीने जाहीर निषेध.
धूळे जिल्ह्यातील दोंडईचा शहरात नुतन महाविद्यालयात शाळेत तेली समाजाच्या ५ वर्षिय बालीकेवर बलात्कार करण्यात आला.त्याचा निषेध म्हणून व आरोपीवर कठोर कार्यवाही होवून फाशीची शिक्षा व्हावी व आरोपीला साथ देणार्यांना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जिल्हा बीड तसेच संताजी यूवा सेना