जय संताजी प्रतिष्ठान जिल्हा बीड तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय आमदार जयदत्त (आण्णा ) क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा आहेत. कार्यक्रम सोमवार दिनांक 2/7/2018 रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थळ माजलगाव मठ, स्व. सोनाजीराव क्षिरसागर सभागृहाजवळ, रविवार पेठ बीड येथे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक ( तेली ) महासभा जिल्हा शाखा परभणी तेली समाज गुणगौरव सत्कार सोहळा दिनांक व वेळ १५ जुलै २०१८, रविवार सकाळी ११:३० वा. स्थळ श्री रोकडा हनुमान मंदिर नवा मोंढा, परभणी. येथे आयोजित करण्यात आलेला आहे. १) इ.१० वी व १२ वी मध्ये ६०% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे गुणगौरव साठी पात्र राहतील. २) अपंग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची अट लागू नाही. (गुणवतांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील)
गुणवंतांना सेवेची संधी मिळालीच पाहिजे - आ.जयदत्त क्षीरसागर
बीड, दि.2 :- गुणवत्ता ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही कतृत्व दाखवणे हे विद्यार्थ्यांच्या हातात आहे. समाजाला हिनवण्याचे दिवस गेले, आरक्षण व आरक्षणाच्या कुबड्या भविष्यकाळासाठी पुरेशा नाहीत त्यामुळे पारंपारीक व्यवसायापेक्षा लेखणीची परंपरा हाती घ्या असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
दि:-१६ जुन २०१८ रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्त जयहिंद चौक जुने शहर अकोला येथे भव्य दिव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. श्रीवास्तव साहेब MBBS, MD मधुमेह, छाती व दमा चे विकार हृदय विकार तसेच सर्व जनरल आजार यांचे विशेषतज्ञ डॉकटर येणार आहे
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची आज शासकिय विश्राम गृह येथे जिल्हयातील पदाधिकारी यांची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीस जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे प्रा गोरख देशमाने प्रा चंद्रशेखर राऊत ह भ प जगन्नाथ क्षिरसागर महादेव राऊत, सुरेश घोडके महादेव मेंगले जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके सचिव अँड विशाल साखरे इत्याादिंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.